धक्कादायक : सुशांतनंतर आता आणखी एका तरुण अभिनेत्याची आत्महत्या

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
kannada actor sushil gowda commits suicide in mandya
kannada actor sushil gowda commits suicide in mandya

बंगळूर : कन्नड अभिनेता सुशील गौडा याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशील याने त्याच्या मूळगावी मंड्या येथे आत्महत्या केली. सुशील हा 30 वर्षांचा होता. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका अभिनेत्याच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

याआधी लोकप्रिय कन्नड अभिनेता चिरंजिवी सारजा याचे अकाली निधन झाले होते. आता सुशीलच्या आत्महत्येने कन्नड चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील याने मंड्यातील इंडूवालू येथे काल राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन त्याच्या मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सुशीलच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करीत आहे.

सुशील हा फिटनेस ट्रेनरही होता. सुशील अंतपुरा या मालिकेतून कर्नाटकमध्ये घराघरात पोचला होता. तो आताच चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत होता. त्याची महत्वाची भूमिका असलेला सालगा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. दुनिया विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

सुशीलच्या आत्महत्येनंतर अभिनेता व दिग्दर्शक दुनिया विजय याने फेसबुकवर म्हटले आहे की, त्याच्यात हिरो बनण्याचे गुण होते. कोणतीही समस्या असली तरी त्याला आत्महत्या हे उत्तर होऊ शकत नाही. मला वाटते की या वर्षात मृत्यूची मालिका थांबणार नाही. कोरोनामुळे लोक भयभीत असून, त्यांच्या जगण्यावरील विश्वासच उडून गेला आहे. लोकांना रोजगार नसून, आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत.  

दरम्यान, हिंदी चित्रटसृष्टीतील अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला  आत्महत्या केली होती. सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुशांत केवळ 34 वर्षांचा होता. त्याने अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. 

त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. 'शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटात तो वाणी कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्यासोबत दिसला होता. भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्यावरील एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने धोनीच्या भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच, आमीर खानसोबत पीके चित्रपटातील त्याची भूमिकाही नावाजली गेली होती. त्याच्या मागील काही दिवसांपूर्वी आलेला 'छिछोरे' हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. याचबरोबर 'केदारनाथ' या चित्रपटात तो सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com