कमलनाथ हे कोरोनापेक्षा मोठं संकट; शिवराजसिंह चौहानांची जीभ घसरली

मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतरही काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष शमण्याची चिन्हे नसून, तो आणखी चिघळत आहे. आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली आहे.
kamal nath is bigger problem in madhya pradesh than corona says shivraj singh chauhan
kamal nath is bigger problem in madhya pradesh than corona says shivraj singh chauhan

भोपाळ :  राज्यातील कोरोनाच्या संकटापेक्षा काँग्रेस नेते कमलनाथ हे मोठे संकट आहेत,  असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. कमलनाथ यांच्याविषयी बोलताना चौहान यांची जीभ घसरली असून, यावरुन त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. याआधी महाराष्ट्रातील भाजपचे विधान परिषदेवरील नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली होती. 

राज्यात तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिंदे यांच्यासमवेत काँग्रेसचे 23 आमदार भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पडले होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवराजसिंह चौहान यांनी हाती घेतली होती. चौहान यांच्या सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना चौहान यांनी कमलनाथ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. 

चौहान म्हणाले की, राज्यातील कोरोना संकटाशी लढण्यास कमलनाथ सक्षम होते का? मध्य प्रदेशात ते कोरोनापेक्षा मोठे संकट आहेत. आपल्या सरकारने या संकटाला योग्य पद्धतीने हाताळले आहे. राज्यातील गरीब नागरिकांच्या खात्यात विविध योजनांतर्गत 40 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हा पैसा काय कमलनाथ यांनी जमा केला आहे का? कमलनाथ यांनी राज्यातील सर्व कल्याण योजना बंद केल्या आहेत. 

या संकटाच्या काळात शेतमाल खरेदी करण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कमलनाथ यांनी पीक विम्याचा हप्ताही भरला नाही. मी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर तातडीने पीक विम्याचा हप्ता भरला. याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 2 हजार 990 कोटी रुपयांचे खात्यात जमा केले आहेत, असे चौहान यांनी सांगितले.  

चौहान यांच्या विधानावर विविध क्षेत्रांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील सत्ता मिळूनही चौहाना यांचे समाधान झाले नसून, ते विरोधकांवर खालच्या पातळीवरील टीका करीत आहेत, असा टोलाही विरोधकांनी लगावला आहे. चौहान यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com