माजी मंत्री शुक्लांचा भाऊ म्हणतो, आम्हाला 19 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला !

कानपूरनजीक चकमकीत गँगस्टर विकास दुबे हा ठार झाला असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, माजी मंत्री संतोष शुक्ला यांच्या भावाने या चकमकीचे स्वागत केले आहे.
jusitce delivered after 19 years says ex minister santosh shuklas brother
jusitce delivered after 19 years says ex minister santosh shuklas brother

लखनौ : कानपूरनजीक काल सकाळी झालेल्या चकमकीत गँगस्टर विकास दुबे हा ठार झाला. दुबे याने तत्कालीन मंत्री संतोष शुक्ला यांची शिवली पोलीस ठाण्यात घुसून 2001 मध्ये हत्या केल्याचा आरोप होता. संतोष शुक्ला यांचे बंधू मनोज यांनी दुबे हा चकमकीत मारला गेल्याचे स्वागत केले आहे. 

राज्यात राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना संतोष शुक्ला हे मंत्री होते. त्याने शिवली पोलीस ठाण्यात घुसून शुक्ला यांची 2001 मध्ये हत्या केली होती. यामुळे राज्यासह देश पातळीवर विकास दुबे चर्चेत आला होता. त्याने राजकीय कारकिर्द सुरू करण्यासाठीच ही हत्या केली होती. दुबे याला राजकारणात प्रवेश करावयाचा होता. तो विधानसभा अथवा लोकसभा लढविण्यासही इच्छुक होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. 

दुबे हा आता चकमकीत ठार झाला असून, याविषयी मनोज शुक्ला यांनी म्हटले आहे की, आम्हाला अखेर 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. विकास दुबे याला पकडण्यास यशस्वी होईल, असे पथक नेमल्याबद्दल मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मी आभार मानतो. याचबरोबर मध्य प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांचेही मी आभार मानतो. दुबे याने ज्यांच्याविरोधात गुन्हे केले ते सर्व आता आनंदी असतील. मला न्याय मिळण्यास 19 वर्षे लागली. त्याला आधीच तुरुंगात पाठवले असते तर अनेक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचली असती. 

या चकमकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. पोलिसांच्या निवदेनानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन जात होता. कानपूरनजीक पोचल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर अचानक गाई आणि म्हशींचा कळप आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेशुद्ध झाले. मात्र, विकास दुबे हा शुद्धित होता. तो पोलिसांचे पिस्तुल घेऊन पलायन केले. 

पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.  

बॉलिवूडमधील थरारक चित्रपटाप्रमाणे शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. या चकमकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास दुबे आणि राजकीय नेत्यांचे असलेले संबध लपविण्यासाठीच चकमकीत विकास दुबेला मारण्यात आले, असा दावाही करण्यात येत आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com