आमदार अन् मंत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मुख्यमंत्री कार्यालयच होम क्वारंटाईन

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून, झारखंडमध्ये आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने सरकारी पातळीवर धावाधाव सुरु झाली आहे.
jharkhand chief minister hemant soren has palced himself in home quarantine
jharkhand chief minister hemant soren has palced himself in home quarantine

रांची : झारखंडमधील मंत्री मिथिलेश ठाकूर आणि आमदार मथुरा महातो हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. या दोघांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह संपूर्ण मुख्यमंत्री कार्यालय होम क्वारंटाईन झाले आहे. 

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे होम क्वारंटाईन झाले आहेत. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री निवासात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या संपर्कात मुख्यमंत्री आले होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री सोरेन यांनी ट्विटरवरही ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंत्री मिथिलेश ठाकूर आणि आमदार मथुरा महातो यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मी पुढील काही दिवस होम क्वारंटाईन होणार आहे. राज्यातील नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्कचा वापर करावा. 

मुंबई : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषत: मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन चिंतित आहे. या परिस्थितीत प्रशासनाला धारावीतून आशादायी चित्र आज दिसून आले आहे. धारावीत मंगळवारी कोरोनाच्या केवळ एक नवीन रुग्ण आढळला आहे. धारावीत आतापर्यंत एकूण  2 हजार 335 रुग्ण आढळले आहेत. धारावीत मंगळवारी कोरोनाचा फक्त एक नवीन रुग्ण आढळला आहे. याचबरोबर आज एकाही कोरोनामृत्यूची नोंद झाली नाही. धारावीतील रुग्णांची एकूण संख्या आता 2 हजार 335 झाली असून, मृतांचा आकडा 81 वर स्थिर आहे. यामुळे धारावीतील रुग्ण वाढण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com