भारताची ताकद वाढतेय; सुरक्षा परिषदेत समावेश होणार

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अखेर भारताचा समावेश होणार आहे. सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
india set to reenter united nations security council
india set to reenter united nations security council

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्यत्वासाठी आशिया प्रशांत गटातून भारत हा एकमेव उमेदवार असल्याने १७ जूनला होणाऱ्या निवडणुकीत भारताच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सुरक्षा समितीच्या रचनेत बदल करून कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढवावी, अशी भारताचा आधीपासून भूमिका आहे. भारताला अस्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर ही भूमिका अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहे. 

भारताने १९५० पासून सात वेळा सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून काम केले आहे. कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे म्हणून भारत प्रयत्नशील आहे. भारताच्या या मागणीला पाठिंबा मिळत आहे. २१ व्या शतकातील कायम बदललेल्या भूराजकीय जगाचे प्रतिनिधित्व सध्याची रचना करत नाही, असा दावा करणाऱ्या देशांची संख्या आता वाढत आहे. सुरक्षा परिषदेतील १५ अस्थायी जागांपैकी पाच जागांसाठी १७ जूनला मतदान होणार आहे. यासाठी आशिया प्रशांत गटातून भारत आणि दक्षिण अमेरिका गटातून मेक्सिकोची निवड निश्चित झाली आहे.

पश्चिम युरोप आणि इतर देश या गटातील दोन जागांसाठी कॅनडा, नॉर्वे आणि आयर्लंड यांच्यात रस्सीखेच आहे तर, आफ्रिका गटातून केनिया आणि जिबुती स्पर्धेत आहेत. २०२१-२०२२ या काळासाठी हे सदस्यत्व असेल. कोरोनाविषाणूच्या संसर्गामुळे यंदा गोपनीय पद्धतीने मतदान होणार आहे. सर्व सदस्य देशांना मतदानासाठी जागा, वेळ आणि दिवस ठरवून दिला जाणार आहे. त्याबाबतची माहिती या देशांना किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या वेळेत आणि दिवशी सदस्य देशाने मतदानासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्या वेळातच मतदान करण्यास परवानगी असणार आहे. 

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत चीनचे सैनिक आहेत की नाहीत, असा प्रश्न काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सरकारला विचारला होता. यावर आता सरकारने उत्तर दिले आहे. पूर्व लडाख भागात मोठ्या संख्येने चिनी सैन्याने घुसखोरी केली आहे, अशी कबुली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली. सरकारडून ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान 6 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत लडाखमधील परिस्थितीवर चर्चा होणार आहे. हा भाग आपला असल्याचा चीनने दावा केला आहे. त्यामुळे चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने तेथे घुसखोरी केली आहे. याबाबत भारताने आवश्यक ती पावले उचलली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com