देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढता वाढता वाढे...

देशात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्येचे रोज नवनवीन उच्चांक देशात स्थापित होतआहेत.
india crosses three lakhs mark in covid19 positive patients
india crosses three lakhs mark in covid19 positive patients

नवी दिल्ली : कोरोनाचा देशभरातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता रूग्णसंख्या साडेआठ लाखांच्या घरात पोचली आहे. यातील १ लाखांपेक्षा जास्त रूग्ण राजधानी दिल्लीत आहे. यातील आशादायी बाब म्हणजे, सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल १८ टक्‍क्‍यांनी घट होणारे दिल्ली हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. 

जुलैच्या मध्याला संसर्गाचा उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाचा प्रवास आता जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांकडून वैद्यकीय पायाभूत संरचना दुर्बल असलेल्या अन्य राज्यांकडे, महानगरांकडून छोटी शहरे आणि ग्रामीण भागाकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रूग्णसंख्या वेगाने वाढणाऱ्या राज्यांमध्ये आता महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू यांच्या बरोबरीने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांचाही समावेश झाला आहे. 

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांत रुग्णसंख्या ५० ते ८० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दिल्लीमध्ये 3 जुलैला २६ हजार ३०४ एवढी सक्रिय रुग्णसंख्या होती. मागील चोवीस तासांत हाच आकडा २१ हजार ५७६ झाला आहे. या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय रुग्णसंख्या २१.७ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हरियाना व तमिळनाडूतही सक्रिय रुग्णसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. 

कर्नाटक वगळता इतर राज्यांत वैद्यकीय पायाभूत सुविधांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे निरीक्षण आहे. कोरोनाचा कहर असलेल्या राज्यांतही आता महानगरांकडून ग्रामीण भागाकडे संसर्गाचा प्रवास सुरू होण्याचा कल हे काळजीचे कारण असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या शहरांकडून आता त्या राज्यांतील इतर शहरांकडे, ग्रामीण व निमशहरी भागांकडे संसर्गाचा प्रवास सुरू झाला आहे. 

दिल्लीतील अनेक कोरोना रूग्णालयांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे. या स्थितीत देशाच्या ग्रामीण भागांतील वैद्यकीय सुविधांची परिस्थिती काय असेल व केंद्रासह त्या त्या राज्य सरकारांसमोर केवढे मोठे आव्हान उभे राहात आहे, याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांना चाचण्यांची गती वाढविण्याची सूचना केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com