कोरोना रुग्णसंख्येत भारत टॉप टेनमध्ये

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताने आधी चीन आणि आता इराणला मागे टाकत पहिल्या दहा देशांमध्ये स्थान पटकावले आहे.
india among top ten nations of corona cases
india among top ten nations of corona cases

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत पोहोचला असून मृत्यूमुखी पडणारांच्या संख्येत इराणच नव्हे तर कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनलाही आपण मागे टाकले, ही चिंताजनक बाब मानली जात आहे. कोरोना महामारीचा भारतातील गेला आठवडाभर सुरू असलेला उद्रेक कायम असून आज सकाळपर्यंत रूग्णसंख्येचा अधिकृत आकडा एक लाख चाळीस हजारांपर्यंत पोहोचला. कोणत्याही एका दिवसातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील किमान ५-६ हजारांच्या वाढीचा कल आजही कायम राहिला. मागच्या २४ तासांत देशात नवे ६९७७ रूग्ण आढळले. 

चिंतेचे कारण नाही : केजरीवाल 

लॉकडाउन-४ सुरू होताच बस, रिक्षा, दुकाने, बाजार हे सारे सुरू करणाऱया राजधानी दिल्लीतील रुग्णांची संख्या १७ मे नंतर झपाट्याने वाढू लागली असून महाराष्ट्र, तमिळनाडू व गुजरात पाठोपाठ दिल्लीत सर्वाधिक रूग्ण झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत मृतांची संख्या आटोक्यात आहे तोवर राज्य सरकारला चिंतेचे कारण नाही. ते म्हणाले की गेल्या ७ दिवसांत रूग्णसंख्या ९७५५ वरून १३४१८ वर पोचली आहे. कोरोना इतक्यात अजिबात जाणार नसून यापुढे त्याच्याशी लढतच जगायचे आहे असे सांगून केजरीवाल म्हणाले की दिल्ली सरकारने लॉकडाउन-४ मधून नियमित व्यवहारांना मोकळीक देताच रूग्णसंख्या वाढण्याचा अंदाज यंत्रणेला होताच. राज्य सरकारने रोज नव्या २२०० रुग्णांवर उपचारांची यंत्रणा तयार ठेवली आहे. मोठ्या संख्येने किमान २५०० लोक कोरोना केंद्रांतून घरी जाऊन बरे झाले आहेत हाही राज्यासाठी दिलासा आहे. 


टॉप-१० कोरोना संक्रमित देश 

1) अमेरिका 
2) ब्राझील 
3) रशिया 
4) स्पेन 
5) ब्रिटन 
6) इटली 
7) फ्रान्स 
8) जर्मनी 
9) तुर्कस्तान 
10) भारत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com