हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या पत्नीला तेलंगना सरकारने पाच कोटी रुपयांबरोबर दिली ही महत्वाची जबाबदारी ! 

संतोष यांच्या पत्नी आता सुर्यपेट जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असतील.
telengan-cm
telengan-cm

हैदराबाद : तेलंगनाचे मुख्यमंत्री नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाची देशभर चर्चा होते.  आता त्यांनी असा निर्णय घेतला आहे की त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

भारत-चीन संघर्षात वीस जवानासह 16 रेजीमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू हुतात्मा झाले होते. या संतोषबाबूच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सुर्यपेट जिल्ह्यात जाऊन संतोष बाबूंच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. देशासाठी वीरमरण आलेल्या संतोष बाबूविषयी अभिमानही बाळगळा. देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संतोष यांच्या पत्नी संतोषी यांना उपजिल्हाधिकारी करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दिले.

याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना पाच कोटींचा धनादेशही दिला. याशिवाय जमीनही देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

संतोष यांच्या पत्नी आता सुर्यपेट जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असतील. संतोष यांचे हैदराबाद सैनिक शाळेत शिक्षण झाले होते. पुढे त्यांची डेहराडून येथील एनडीएमध्ये निवड झाली होती. ते लष्करात कर्नलपदापर्यंत पोचले होते.

मुख्यमंत्री राव हे स्वत: पाच कोटीचा चेक आणि उपजिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीचे पत्र घेऊन संतोष यांच्या घरी आज पोचले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मदतीविषयी संतोषबाबूंच्या आईवडीलांनी त्यांचे आभार मानले आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com