गोहत्या केल्यास होणार आता दहा वर्षाची शिक्षा आणि पाच लाखाचा दंड ! 

गोहत्या केल्यास होणार आता दहा वर्षाची शिक्षा आणि पाच लाखाचा दंड ! 

यूपीत गोहत्येला पूर्णपणे बंदी आहे.

लखनौ : "" गाय, गीता आणि गंगा' हीच भारताची खरी ओळख असल्याचे मत उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी म्हटले आहे. ते ani शी बोलत होते. 

आपला देश विश्वगरु असल्याचे स्पष्ट करून चौधरी म्हणाले, की गाय, गीता आणि गंगेचे संपूर्ण देशात पुजन केले जाते. या तिन्ही गोष्टी पवित्र आहेत. 

उत्तर प्रदेश सरकारने गोहत्याबाबत सुधारित विधेयक 2020 आणल्यानंतर ते बोलत होते. यूपीत गोहत्येला पूर्णपणे बंदी आहे. जो गाईची हत्या करेल त्याला शिक्षा दिली जाते. जर कोणी गायीची हत्या केली त्याला एक ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते.या शिक्षेबरोबरच एक लाख ते तीन लाखापर्यंत दंडची तरतूद कायद्यात होती. 

मात्र सुधारित कायद्याअंतर्गत आता दहा वर्षे शिक्षा आणि पाच लाखाचा दंड होणार आहे.. त्यामुळे राज्यात कोणीही यापुढे गोहत्या करणार नाही. जर का तसे झाले तर कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 

मोदी सरकारने यापूर्वीच देशभर तसा कायदा आणला आहे. हा कायदा जेव्हा आणला तेव्हा मोदी सरकारविरोधात टीका करण्यात आली होती. याच मुद्यावरून यूपीत काही धर्मियांना लक्ष्यही करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारने याबाबत कोणतीही तडजोड केली नव्हती. उलट यूपीत हा कायदा अधिक कडक करण्यात आला असून शिक्षेची तरतूदही वाढविली आहे. 

यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारने या कायद्यात सुधारणा केल्याने यापुढे गोहत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली दिसत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com