खुशखबर : घरबसल्या तुम्हालाच करता येणार कोरोना चाचणी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) 'कोविसेल्फ' कीटला मान्यता दिली आहे.
ICMR issues advisory for COVID19 home testing using Rapid Antigen Tests
ICMR issues advisory for COVID19 home testing using Rapid Antigen Tests

नवी दिल्ली : कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारी चाचणी केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहणे, खासगी लॅबकडून होणारा विलंब, दोन-तीन दिवस रिपोर्ट न येणं... यापासून आता तुमची सुटका होणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा कोरोनाबाधिताच्या थेट संपर्कात असल्यास तुम्हाला घरच्या घरी स्वत:लाच कोरोना चाचणी करता येणार आहे. या चाचणीचा रिपोर्ट केवळ १५ मिनिटांत मिळणार आहे. त्यामुळे आपण कोरोनाबाधित आहोत किंवा नाही, हे घरच्या घरी कळणार आहे. (ICMR issues advisory for COVID19 home testing using Rapid Antigen Tests)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) 'कोविसेल्फ' कीटला मान्यता दिली आहे. पुण्यातील माय लॅब प्रयोगशाळेने हे कीट बनवले आहे. घरीच रॅपिड टेस्ट करता येणारे हे देशातील पहिलेच कीट ठरणार आहे. हे कीट आपल्या जवळच्या औषध दुकानात डॅाक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकेल. पण केवळ लक्षणे असलेले रुग्ण किंवा बाधितांच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांनाच या कीटचा वापर करण्याची परवानगी असल्याचे ICMR ने स्पष्ट केलं आहे.

'कोविसेल्फ'चा वापर कसा करायचा?

चाचणी करण्याची पध्दत अत्यंत सोपी आहे. औषध दुकानातून घरी कीट आणल्यानंतर त्यामध्ये माहितीपुस्तिका व चाचणीसाठी आवश्यक साहित्य असेल. चाचणीपुर्वी माय लॅबचे एक अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागले. अॅपमध्ये आपली नोंदणी केल्यानंतर चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणीसाठी केवळ नाकातील स्वॅब घ्यावा लागेल. स्वॅब घेतल्यानंतर कीटमध्ये सोल्युशनमध्ये टाकावा लागेल. त्यानंतर कीटमध्ये स्ट्रीपवर सोल्युशन टाकावे लागेल.
 
या कीटचा फोटो काढून अॅपमध्ये अपलोड केल्यानंतर १५ मिनिटांमध्ये अॅपवरच आपल्याला रिपोर्ट मिळेल. याची नोंद थेट ICMR कडे होणार आहे. ही चाचणी पॅाझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णांना गाईडलाईन्सनुसार गृह विलगीकरणात किंवा तब्येतीनुसार रुग्णालयात जावे लागेल. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच संबंधितांना RT-PCR चाचणी करावी लागेल. 

कीटची किंमत २५० रुपये

कीटची किंमत २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. माय लॅबची सध्याची कीट उत्पादनाची क्षमता आठवड्याला ७० लाख एवढी आहे. पुढील काही दिवसांत ही क्षमता एक कोटीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती लॅबकडून देण्यात आली. अद्याप हे कीट बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. लवकरच त्याची घोषणा केली जाणार आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com