hydroxycholoquine side effects are dangerous to corona patients | Sarkarnama

सावधान! कोरोनावरील या औषधाचे आहेत अनेक धोके

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार मलेरियावरील हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा कोरोनासाठी वापर करण्याचे समर्थन केले जात आहे. मात्र, या औषधाच्या वापराचे अनेक धोके असल्याचे समोर आले आहे. 

नवी दिल्ली : कोरोनावर उपकारक मानली जाणाऱ्या मलेरियारोधक हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या सेवनाचे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ‘लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या ९६ हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये जे रूग्ण या औषधाचे सेवन करतात त्यांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो असे आढळून आले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या जगभर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाला मोठी मागणी आहे, खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी मी देखील रोज हे औषध घेत असल्याचे विधान पत्रकार परिषदेत बोलताना केले होते. या औषधाच्या उपकारकतेबाबत वैद्यकीय चाचण्यांतून काही ठोस निष्कर्ष हाती लागत नाही तोवर त्याचा बाहेर वापर करण्याची परवानगी दिली जाऊ नये असे अभ्यासकांनी म्हटले आहे. हे औषध घेतल्याने आरोग्याला नेमका काय फायदा होता हे स्पष्ट झालेले नाही असेही संशोधकांनी म्हटले आहे. 

 

ट्रम्प यांची नाराजी  

या संशोधनामध्ये अमेरिकेतील ६७१ रूग्णालये सहभागी झाली होती, यात १४ हजार ८८८ रुग्णांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्विन हे औषध मॅक्रोलाईड या अँटिबायोटिकशिवाय देण्यात आले होते तर अन्य ८१ हजार १४४ रुग्णांना सरकारी उपचार देण्यात आले होते. यामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे औषध घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर तुलनेने अधिक असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी मात्र या संशोधनावर नाराजी व्यक्त केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख