Hurricane 'Amphan' on the coast of Odisha | Sarkarnama

ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘अम्फान’ चक्रीवादळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 मे 2020

संशोधकांनी शक्तीशाली संगणकांच्या मदतीने हवामानाचे प्रारुप तयार करून यापुढील वादळे ही अधिकाधिक जोरदार असतील, असा अंदाज वर्तविला आहे.

न्यूयॉर्क : भारताच्या पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीवर सध्या ‘अम्फान’ नावाचे चक्रीवादळ घोंघावत आहे. जगातील विविध भागात सातत्याने निर्माण होणारी ही चक्रीवादळे यापुढे अधिक तीव्र व प्रभावशाली असतील. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक हवामान बदल हे असल्याचे एका नव्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. 

संशोधकांनी शक्तीशाली संगणकांच्या मदतीने हवामानाचे प्रारुप तयार करून यापुढील वादळे ही अधिकाधिक जोरदार असतील, असा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजाच्या पुष्टीसाठी त्यांनी उपग्रहांनी पाठविलेल्या ४० वर्षांमधील छायाचित्रांमधील कल जाणून घेतला आहे. 

अमेरिकेतील ‘नॅशनल ओशिनोग्राफिक अँड जेम्स कोसिन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले असून त्यासंबंधीचा अभ्यासलेख ‘प्रोसिडिंग ऑॅफ द नॅशनल ऑफ सायन्स’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे.  महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता गेल्या दोन दशकात दुपटीने वाढली आहे, असे यात म्हटले आहे. 

वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती 
अटलांटिक महासागराच्या प्रदेशात ‘हुरिकेन’, पूर्व प्रशांत महासागर पट्ट्यात ‘टायफून’ तर हिंद महासागराच्या भागात ‘सायक्लोन’ या संज्ञा चक्रीवादळासाठी वापरल्या जातात. प्रभावी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे रूपांतर जगातील अतिशीत आणि भयावह नैसर्गिक आपत्तीमध्ये होत असते. यापुढी ही वादळे जास्त विनाशकारी ठरणार आहेत, असे अभ्यास लेखात सूचित केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख