टिकटॉकवर बंदी घातली पण, बंद होणार का?

भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर देशभरात चिनी गोष्टींवर बहिष्कार घालण्याची मागणी जनतेत जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातल्यानंतर ही अॅप्स बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
how tiktok and other chinese apps ban will work in india
how tiktok and other chinese apps ban will work in india

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीच कार्यवाही करीत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. आता केंद्र सरकारने लोकप्रिय टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. मात्र, यातील काही अॅप्स वगळता इतर सर्व अॅप्स सुरूच राहतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. टिकटॉक आता गुगलचे प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. 

चिनी अॅप्स देशाच्या सार्वभौमतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर ते देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यामुळे अशा चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्रालयाने दिली होती. सरकारने आता या अॅप्सवर बंदी घातली असून, त्याची कार्यवाही होण्यास काही कालावधी लागणार आहे. मंत्रालयाने अॅप्सवर घातलेल्या बंदीचे पालन इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यां करतील. याबाबत या कंपन्यांना आदेश दिले जातात. इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी या या आदेशाचे पालन केल्यानंतर ही अॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांना या अॅप्सच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचा संदेश येतो. 

आता या बंदीचा सर्वाधिक फटका टिकटॉक आणि यूसी न्यूज या अॅप्सना बसेल. कारण हे अॅप्स लाईव्ह फीड वापरतात. त्यामुळे त्यांच्या वापरावर निर्बंध येतील. परंतु, वापरासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसलेली अॅप्स वापरता येतील. परंतु, ही अॅप्स गुगलचे प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधून हटविली जातील. त्यामुळे ती नव्याने डाऊनलोड करणे शक्य होणार नाही. गल्वान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी होत होती. याचबरोबर  चिनी अॅप्सवर बहिष्कार घालण्याची मागणीही जोर धरत होती. तसेच, केंद्र सरकारने अनेक चिनी कंपन्यांकडून पीएमकेअर्स फंडासाठी देणग्या घेतल्याचे समोर आले होते. यावरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले होते. आता सरकारने हा अॅप्सवर बंदीचा निर्णय घेऊन विरोधकांना उत्तर दिले आहे. 

सरकारने बंदी घाललेली अॅप्स :  
1. Tik Tok

2. Shareit

3. Kwai

4. UC Browser

5. Baidu map

6. Shein

7. Clash of Kings

8. DU battery saver

9. Helo

10. Likee

11. YouCam makeup

12. Mi Community

13. CM Browser

14. Virus Cleaner

15. APUS Browser

16. ROMWE

17. Club Factory

18. Newsdog

19. Beauty Plus

20. WeChat

21. UC News

22. QQ Mail

23. Weibo

24. Xender

25. QQ Music

26. QQ Newsfeed

27. Bigo Live

28. SelfieCity

29. Mail Master

30. Parallel Space

31. Mi Video Call - Xiaomi

32. WeSync

33. ES File Explorer

34. Viva Video - QU Video Inc

35. Meitu

36. Vigo Video

37. New Video Status

38. DU Recorder

39. Vault- Hide

40. Cache Cleaner DU App studio

41. DU Cleaner

42. DU Browser

43. Hago Play With New Friends

44. Cam Scanner

45. Clean Master - Cheetah Mobile

46. Wonder Camera

47. Photo Wonder

48. QQ Player

49. We Meet

50. Sweet Selfie

51. Baidu Translate

52. Vmate

53. QQ International

54. QQ Security Center

55. QQ Launcher

56. U Video

57. V fly Status Video

58. Mobile Legends

59. DU Privacy

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com