तुमचे तोंड आधी बंद ठेवा; पोलिस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावले

कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरू झालेले आंदोलन हाताळण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अपयशी ठरल्याची टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ह्यूस्टनच्या पोलिस प्रमुखांनी अध्यक्षांनाच त्यांचे तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
houston police chief said trump to keep his mouth shut
houston police chief said trump to keep his mouth shut

न्यूयॉर्क : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस कारवाईत मृत्यू झाल्यानंतर आंदोलनाचे लोण देशभर पसरले आहे. या आंदोलनाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या विधानांमुळे ते शमण्याऐवजी आणखी भडकले आहे. यामुळे ह्यूस्टनचे पोलिसप्रमुख अर्ट अॅसिवेडो यांनी ट्रम्प यांनी थेटपणे वाढत्या हिंसाचाराला जबाबदार धरले असून, ट्रम्प यांनी त्यांचे तोंड बंद ठेवावे, असा सल्ला दिला आहे. 

देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सर्व राज्यांची गव्हर्नरांसोबत ऑनलाइन बैठक घेतली होती. या वेळी ट्रम्प यांनी सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना आंदोलन दडपून टाकण्यास सांगितले होते. यावर अॅसिवेडो यांनी ट्रम्प यांना सुनावले होते. याचा व्हिडीओ लिक झाला होता आणि तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटले होते की,  देशातील सर्व पोलिस प्रमुखांच्या वतीने मी अमेरिकेच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की, तुमच्याकडे करण्यासाठी काही भरीव काम नसेल तर, तुमचे तोंड बंद ठेवा. 

या व्हिडीओमुळे अॅसिवेडो जनतेत लोकप्रिय बनले आहेत. त्यांनी ट्रम्प यांनी तरुणांच्या जिवाशी खेळू नका, अशी विनंतीही केली होती. देशभरात आंदोलनाचा भडका उडाला असून, अनेक ठिकाणा जाळपोळ आणि लूटमार सुरू आहे. यामुळे ट्रम्प यांनी लष्कर तैनात करण्याचा इशारा दिला होता. 

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णी व्यक्तीला मिनीयापोलिस शहरातील पोलिस अधिकाऱ्याने 25 मे रोजी पकडले होते. फ्लॉईड याला जमिनीवर पाडून या अधिकाऱ्याने गुडघ्याने त्याची मान दाबून ठेवली होती. यातच जॉर्ज याचा मृत्यू  झाला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकला होता. यावरुन जनतेत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये वर्णभेदविरोधी आंदोलन सुरू झाले आहे. काही ठिकाणी या आंदोलाना हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढते आंदोलनाची समस्या अमेरिकेसमोर आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com