Home Minister Amit Shah Tested Positive for Corona | Sarkarnama

Breaking - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनाचा विळखा भल्याभल्यांना पडत आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः अमित शहा यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

नवी दिल्ली : कोरोनाचा विळखा भल्याभल्यांना पडत आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः अमित शहा यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपल्याला कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्याने तपासणी करुन घेतली असता लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती चांगली असून वैद्यकीय सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलिगीकरण करुन घेऊन तपासणी करुन घ्यावी, असा सल्ला शहा यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत अमित शहा यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. दिल्लीच्या कोरोना संकटातही ते सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले चिंतेत पडले आहे. 

दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती त्यांचे पूत्र अभिषेक बच्चन यांनी दिली आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख