भाजपने हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला : हिंदू महासभेचा आरोप 

त्यांनी येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करावे
Hindu Mahasabha makes serious allegations against BJP
Hindu Mahasabha makes serious allegations against BJP

बंगळूर : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने म्हैसूरमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप हिंदू महासभेचे कर्नाटकचे राज्य सचिव धर्मेंद्र यांनी केला आहे. कायद्याविरोधात लढण्यासाठी संघ परिवाराचा वापर करून भारतीय जनता पक्ष आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. (Hindu Mahasabha makes serious allegations against BJP)

मंगळूर येथे पत्रकारांना संबोधित करताना हिंदू महासभेचे धर्मेंद्रआरोप केला की, संघ संघटनांचा मंदिर पाडण्याविरोधातील लढा हा भाजप सरकारचे अपयश झाकण्यासाठी चाललेला डाव आहे. सरकारविरोधात संघर्ष करणाऱ्या संघ परिवारावर आम्हाला दया वाटते. जर ते त्यांच्या लढ्याबद्दल प्रामाणिक असतील तर त्यांनी येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करावे आणि हिंदुत्वाचा पक्ष असलेल्या हिंदू महासभेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन धर्मेंद्र यांनी केले आहे. 

ते म्हणाले की, भाजप मंदिर पाडण्याचे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सांगत आहे. त्याच वेळी, ते इतर समुदायांच्या बेकायदेशीर धार्मिक संरचनांविरोधात वागत नाहीत. भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांनी उघडपणे अशी भूमिका घ्यावी की ते भविष्यात पक्षाला पाठिंबा देणार नाहीत. मंदिरांवर हल्ले होत राहिले तर हिंदू महासभा ही भाजप आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com