सरकारकडून पोलिसांचीच मुस्कटदाबी..सोशल मीडिया वापरावर निर्बंध!

सोशल मीडियावर अनेक वेळा सरकारच्या विरोधात पोस्ट केलेल्या असतात. सरकारच्या वाईट कामाचा लेखाजोखाही अनेक जण सोशल मीडियावर देत असतात. परंतु, आता पोलिसांनाच सोशल मीडियापासून दूर करण्याचा निर्णय गुजरात राज्याने घेतला आहे.
gujarat government issued social media code of conduct to police personnel
gujarat government issued social media code of conduct to police personnel

अहमदाबाद : काही दिवसांपूर्वी एका मंत्र्याच्या मुलावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर राज्य सरकारलाही जनमताच्या रेट्यामुळे तिच्यावरील कारवाईचा पुनर्विचार करावा लागला होता. या प्रकरणापासून सावध झालेल्या गुजरात सरकारने आता पोलीस आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरावर सेन्सॉरशिप लादली आहे. 

पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी पोलिसांसाठी सोशल मीडिया नियमावली जाहीर केली आहे. देशात प्रथमच अशा प्रकारची नियमावली लागू होत आहे. यानुसार पोलिसांनी राजकीय आणि सरकारविरोधी मते सोशल मीडियावर व्यक्त करु नयेत. सरकारच्या निर्णयांवर टीका करणारी कोणतीही पोस्ट करुन नये. याचबरोबर सध्या अस्तित्वात अससेल्या कायद्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर करु नयेत. सरकारविरोधी ऑनलाइन मोहिमा सोशल मीडियावर नेहमी सुरू असतात. यापुढे अशा मोहिमांमध्ये पोलिसांनी सहभागी होऊ नये. 

सोशल मीडियावरील जात, धर्म, वंश आणि उपजाती यांचे वेगवेगळे ग्रुप्स असतात. अशा ग्रुप्समध्ये पोलिसांनी सहभागी होऊ नये. यात केवळ गुप्तचर विभागातील कर्मचारी अपवाद असतील. याचबरोबर सरकारी स्रोतांचा वापर सोशल मीडिया वापरण्यासाठी करु नये. सर्वांत महत्वाचे म्हणजे कर्तव्यावर असताना सोशल मीडिया वापरू नये, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर आणि खातेनिहाय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

सुरतमध्ये वराछा येथे गुजरातचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मुलांशी वाद झाल्यानंतर महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनीता यादव हिचा वाद झाला होता. त्यानंतर तिने राजीनामा दिला होता. तो नामंजूर करून तिची बदली करण्यात आली. त्यानंतर आज सुनिता यादवने पुन्हा एकदा सोशल मिडियावर अपिल करत नव्या हॅशटॅगसह पाठिंब्याचे आवाहन केले होते.

सुरतच्या संबंधित भागात कारोनामुळे कर्फ्यू आहे. त्यामुळे नियमाचे पालन करणे हे मंत्रीपुत्रालाही आवश्‍यक आहे. पण, नियम तोडणाऱ्या मंत्री पुत्राला यादव हिने दोन खडे बोल सुनावले. कारवाईचा इशारा दिला. या वादानंतर मंत्री पुत्राने वरिष्ठांकडे तक्रार केली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाल्याने घटनेचे वास्तव जगापुढे आले. 

सुनीता या घटनेनंतर जेव्हा पोलीस स्टेशनला आली तेव्हा तिची बदली करण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले. हा तिच्यासाठी खरे तर धक्का होता. पोलीसच पोलीसाची बाजू घेत नाहीत. सत्य जाणून घेत नाहीत याचे दु:ख तिला झाले. संताप, चीड आली. तिने तातडीने नोकरीचा राजीनामाही दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com