google removed mitron app from play store | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

'टिकटॉक'ला टक्कर देणारे 'मित्रो' का झाले बंद ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जून 2020

टिकटॉक या चिनी अॅपला भारतीय उत्तर म्हणून मोठा गाजावाजा करीत आलेले मित्रो अॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्याची घोषणा केल्यानंतर टिकटॉक अॅपप्रमाणेच छोटे व्हिडीओ शेअरिंग करता येणारे मित्रो अॅप सादर करण्यात आले होते. या अॅपचे एक महिन्याच्या आत सुमारे 50 लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत. हे अॅप सुरक्षिततेच्या कारणास्तव प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 

देशात चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे जनतेमध्ये चिनी उत्पादने सोडून भारतीय उत्पादनांकडे वळण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मित्रो अॅप सादर करण्यात आले होते. मात्र, हे अॅप हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आयआयटी रुडकीमधील शिवांक अगरवाल या विद्यार्थ्याने या अॅपची कल्पना मांडल्याचे वृत्त होते. मात्र, अशा नावाचा कोणी व्यक्तीच नसल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. 

मित्रो अॅपचा सोर्स कोड आणि सर्व फीचर्स तसेच, यूजर इंटरफेस पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी क्यूबॉक्ससकडून विकत घेण्यात आल्याचे समोर आले होते. आता गुगलने हे अॅप प्ले स्टोअरवरुन हटविले आहे. स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसी भंग केल्याप्रकरणी गुगलने ही कारवाई केली आहे. मित्रो अॅपमुळे सुरक्षिततेचा आणि प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण झाला होता. या अॅपच्या डेव्हलपरची वेबसाईट उघडल्यानंतर ब्लँक पेज दिसत होते. तसेच, या अॅपची सुरूवातील कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी नव्हती.  

गुगलच्या धोरणानुसार, दुसऱ्या अॅपचा कंटेंट कॉपी करुन आणि त्यात कोणताही मूळ बदल अथवा भर न टाकता वापरणे हे नियमांचे उल्लंघन आहे. गुगल प्लेवर असलेल्या इतर अॅपसारखेच असलेल्या दुसऱ्या अॅपला परवानगी देता येत नाही. अॅपमध्ये यूजरला वेगळा कंटेंट अथवा सेवा द्यायला हवी.  

सावधान! 'निसर्ग'ची तीव्रता वाढतेय; मुबंईसह कोकणात दक्षतेचा इशारा

नवी दिल्ली : निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, ते गुजरात आणि महाराष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हे वादळ पुढील 24 तासांत मुंबईत धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे 11 किलोमिटर प्रतितास वेगाने सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची चिन्हे आहेत. पुढील 12 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल आणि त्यानंतरच्या 24 तासांत त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख