goa chief minister says wont allow interstate travel | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध; गोव्याच्या सीमा बंदच राहणार

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

केंद्रात आणि गोवा राज्यात भाजपचे सरकार असले तरी केंद्राचा निर्णय लागू करण्यास गोवा सरकारने विरोध केला आहे. आंतरराज्य वाहतुकीस परवानगी न देण्याची भूमिका गोवा सरकारने घेतली आहे. 

पणजी : केंद्र सरकारने आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध हटविले असले तरी, गोवा राज्य सरकार मात्र, अशा वाहतुकीस परवानगी देणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली. केंद्र सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले असून, त्यांची टप्प्याटप्प्याने गोव्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गोव्यातही भाजपचे सरकार असून, राज्य सरकारने केंद्राच्या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, केंद्र सरकारने शिथिल केलेले निर्बंध गोव्यातही लागू होतील. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, आम्ही आंतरराज्य वाहतुकीस किमान महिनाभर परवानगी देणार नाही. राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, मॉल आणि रेस्टॉरन्ट 8 जूनपासून सुरू होतील. 

राज्यातील मॉल, जिम आणि रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केंद्र सरकारकडे मागील आठवड्यात केली होती. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेवेळी ही मागणी करण्यात आली होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार, आंतरराज्य आणि राज्यांतर्गत माल आणि प्रवासी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रवासासाठी कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही. मात्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रवास नियंत्रित करु शकतात. याबाबत आधी जनतेला पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गोव्यात कोरोनाचे 42 रुग्ण बरे झालेले असून, सध्या केवळ 28 रुग्ण आहेत. 

मंत्रीच पॉझिटिव्ह निघाला; 'या' राज्यात मुख्यमंत्री क्वारंटाइन

डेहराडून : उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची लवकरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या सर्वांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. सत्पाल महाराज, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि कार्यकर्ते असे एकूण 21 जण रविवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सत्पाल महाराज हे शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख