राजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा  - Gehlot claims anger against BJP in every household in Rajasthan | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा 

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑगस्ट 2020

मध्यंतरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनीही पायलट यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करीत कठोर शब्दात समाचार घेतला होता.

जयपूर : " ज्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे अशांसह भाजप नेत्यांविरोधात घराघरात संताप व्यक्त केला जात असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. 

राजस्थानात येत्या 14 ऑगस्टरोजी मुख्यमंत्री गेहलोत हे आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करणार आहेत. कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्याने गेहलोत यांचे सरकार अडचणीत सापडले आहे.

पायलट यांनी भाजपबरोबर हात मिळवणी करून कटकारस्थान केल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. कधी ते पायलटांना भावनीक साद घालतात तर कधी कठोर टीका करतात. मात्र पायलट यांनी आतापर्यंत त्यांना कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही. 

मध्यंतरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनीही पायलट यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करीत कठोर शब्दात समाचार घेतला होता. या दोघांना आयचे मतदारसंघ मिळाले त्यांनी कधी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या का ? कधी सतरंज्या उचलल्या का असा सवालही केला होता. एकंदरच त्यांनी पक्ष सोडण्यावर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रातील सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी पायलट यांच्यावरही सडकून टीका केली आहे. 

जे बंडखोर आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आता जो काही निर्णय होणार आहे तो येत्या 14 तारखेला राजस्थानच्या विधानसभागृहात होणार आहे. गेहलोत हे बहुमत मिळविण्यात यशस्वी होतील का ? हा प्रश्‍न आहे. त्यांनी स्वत: आपल्याकडे 109 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर सचिन पायलटांकडे 18 आमदार असल्याचे सांगितले जाते. 

पायलट यांना पुन्हा पक्षात आणण्याचे खूप प्रयत्न झाले पण, अद्याप तरी ते पक्षात परतले नाहीत. ते पक्षापेक्षा गेहलोत यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. गेहलोतांना बाजूला करण्याची त्यांची एकमेव मागणी आहे. मात्र कॉंग्रेस त्यासाठी तयार नाही. बंडखोरीनंतर पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आहे. 

येत्या 14 ऑगस्टरोजी गेहलोत सरकार जाणार की राहाणार हे स्पष्ट होईल. मात्र अजूनही गेहलोत खूप आशावादी आहेत. त्यांना असे वाटते की बंडखोरांनी पुन्हा पक्षात परतावे. मात्र तसे चित्र अजूनही दिसत नाही. आज गेहलोत यांनी एक ट्‌विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की राजस्थानात ज्या कॉंग्रेसपक्ष सोडला आहे त्यांच्यासह भाजपविरोधात प्रचंड संताप आणि राग व्यक्त होत आहे. लोकांच्या भावना लक्षात घेवून निदान ज्यांनी पक्ष सोडला आहे असे आमदारांनी पुन्हा पक्षात येतील असा मला विश्वास वाटतो असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख