चौथ्या लॉकडाउमध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल एवढी वाढ

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेला चौथा लॉकडाउन आज संपत असून, याच काळात देशातील एकूण रुग्णसंख्येतील निम्मे रुग्ण आढळले आहेत.
fourth phase of lockdown accounts half of corona cases in india
fourth phase of lockdown accounts half of corona cases in india

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सरकारने 18 ते 31 मे या कालावधीत चौथा लॉकडाउन लागू केला. देशभरात कोरोनाचे सुमारे 85 हजार 975 रुग्ण या कालावधीत सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे आहे. आज मध्यरात्री संपत असलेल्या चौथ्या लॉकडाउनमध्ये वाढलेल्या रुग्णांचा आकडा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. 

चौथ्या लॉकडाउनमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 47.20 टक्के रुग्ण आढळले. देशात 21 मार्चपासून सुरू असलेल्या पहिल्या 21  दिवसांच्या लॉकडाउनमध्ये  10 हजार 877 रुग्ण आढळले होते.  दुसरा लॉकडाउन15 एप्रिलपासून सुरू होऊन 3 मे रोजी संपला होता. या 19 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये 31 हजार 94 रुग्ण सापडले होते. तिसरा लॉकडाउन 4 ते 17 मे या कालावधीत होता. या 14 दिवसांच्या कालावधीत 53 हजार 636 रुग्ण सापडले होते. 

देशात 24 मार्चपर्यंत केवळ 512 कोरोना रुग्ण होते. तेव्हापासून देशातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. जगभरातील परिस्थितीचा विचार करता कोरोना रुग्णसंख्येत भारताचा नववा क्रमांक आहे. 

पहिला रुग्ण केरळमध्ये 

देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये 30 जानेवारीला सापडला होता. चीनमधील वुहान युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेला हा वैद्यकीयचा विद्यार्थी भारतात आल्यानंतर पॉझिटिव्ह सापडला होता. 

देशातील रुग्णसंख्या वाढतेय 

देशात मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 8 हजार 380 ने वाढली आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 143 वर पोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 हजार 164 जणांचा बळी गेला आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 89 हजार 995 असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 86 हजार 930 आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 47.75 टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  

पुणे : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार, उद्योग, व्यवसाय निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज 'मन की बात'मध्ये सांगितले. अनेक वस्तू देशातच तयार करून त्याला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहे, असे मोदी यांनी नमूद केले. मोदी यांनी 'मन की बात'मध्ये आत्मनिर्भर भारत, जागतिक योग दिन, पर्यावरण दिन आदी बाबत विचार मांडले. लॅाकडाउनच्या काळात देशातील अनेक नागरिकांनी उल्लेखनीयउपक्रम राबविले, या सर्वांचे मोदी यांनी कैातुक केले. सटना (ता. नाशिक) येथील राजेंद्र जाधव यांनी टॅक्टरच्या माध्यमातून सॅनिटायझर मशिन तयार केले. या माध्यमातून जाधव
यांनी परिसर सॅनिटाइज करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. राजेंद्र जाधव यांच्या या कार्याचे मोदी यांनी विशेष कैातुक केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com