देवेगौडांनी मौन सोडले : कॉंग्रेस, सिध्दरामय्यांवर चढवला हल्ला - EX Prime Minister H D Devegaouda Broke his silence about Congress | Politics Marathi News - Sarkarnama

देवेगौडांनी मौन सोडले : कॉंग्रेस, सिध्दरामय्यांवर चढवला हल्ला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 डिसेंबर 2020

मी माजी पंतप्रधान आहे. मी पक्ष दुसऱ्याच्या दारात नेईन का? याला काही अर्थ आहे का? कोणत्या ज्योतिषाने ही भविष्यवाणी केली? असे सवाल देवेगौडा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्यांचा रोख कॉंग्रेसवर होता. राजकीय पक्षाबद्दल इतके हलके बोलू नये. हा पक्ष इतका सहज काढला जाऊ शकत नाही. फक्त देवेगौडा आणि त्याचा मुलगाच नाही तर इतर लोकही या पक्षाला अधिक बळकट करतील, असे ते म्हणाले

बंगळूर  : माजी पंतप्रधान आणि धजद सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांनी शनिवारी कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला जिवंत ठेवण्याची व स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा केली. यासह धजद भाजपमध्ये विलीन होईल, या विषयावरही पडदा टाकला. हे सांगताना कॉंग्रेसवर विशेषतः विरोधी पक्ष नेते सिध्दरामय्यांवर त्यांनी जोरदार हल्ला केला.

मी माजी पंतप्रधान आहे. मी पक्ष दुसऱ्याच्या दारात नेईन का? याला काही अर्थ आहे का? कोणत्या ज्योतिषाने ही भविष्यवाणी केली? असे सवाल देवेगौडा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्यांचा रोख कॉंग्रेसवर होता. राजकीय पक्षाबद्दल इतके हलके बोलू नये. हा पक्ष इतका सहज काढला जाऊ शकत नाही. फक्त देवेगौडा आणि त्याचा मुलगाच नाही तर इतर लोकही या पक्षाला अधिक बळकट करतील, असे ते म्हणाले.

२०२३ च्या निवडणुकांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, धजद स्वतंत्रपणे बहुमत मिळविण्याच्या दिशेने काम करीत असून भाजपमध्ये विलीनीकरणाची शक्‍यता नाही. जनता काय आज्ञा देणार आहे ते पाहूया. आम्ही स्वबळावर सत्तेत येण्याच्या दिशेने काम करीत आहोत. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे अध्यक्ष के. प्रतापचंद्र शेट्टी यांना काढून टाकण्यासाठी धजद, भाजपशी जवळीक साधत असल्याच्या वृत्तावर गौडा यांनी आपले मौन मोडले. दोन पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी युती केली तेव्हा धजदने २०१८ मध्ये कॉंग्रेसला हे पद सांभाळण्यास सांगितले होते, असे गौडा म्हणाले.

मी होरट्टी यांना कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. पण शेवटी त्यांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आले. त्यामुळे ते दु:खावले गेले. ते ७ वेळा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. केवळ 78 जागांवर कॉंग्रेसने के. आर. रमेश कुमार यांना विधानसभा अध्यक्ष केले. आमच्या समर्थनाशिवाय हे शक्‍य झाले असते का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेसनेही पक्ष बदलला असल्याचे गौडा म्हणाले. ममता बॅनर्जी भाजप सरकारमध्ये रेल्वेमंत्री नव्हत्या का? बिहारमध्ये काय झाले? आणि, तुम्ही शिवसेनेचे सरकार बनवले नाही? त्यांनी (कॉंग्रेसने) धजदच्या धर्मनिरपेक्षतेचा नाश करण्यासाठी फक्त मुस्लिमांचे कंत्राट घेतले आहे का, असे त्यांनी विचारले. भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना धजद हा भाजपाचा 'बी' संघ असल्याचे सांगण्यास भाग पाडले. त्यांना हे सांगण्यास कोणी भाग पाडले? त्याचा परिणाम काय झाला? तांदूळ, दूध आणि भाग्य देऊनही तुम्ही ७८ जागांपर्यंत खाली आला. असा टोला त्यांनी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर मारला.

ज्यांनी आम्हाला भाजपचा 'बी' संघ म्हटले, त्यांनी नंतर माझेच दार ठोठावले. धजदला, कॉंग्रेसला बळकट करायचे होते. कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी सहा मुख्यमंत्र्यांसह देशातून धर्मनिरपेक्ष नेते आले. त्यावेळी १८ राज्यांत कॉंग्रेसची ओळख गेली होती. हे कुणी बिघडवले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रादेशिक पक्ष देशासाठी अपरिहार्य
७ जानेवारी २०२० रोजी धजदची बैठक बंगळूरच्या पॅलेस मैदानावर आयोजित केली आहे. ही बैठक आमची परीक्षा असेल. तळागाळातील कार्यकर्ते, आमदार अशा सर्वांना बोलावले आहे. जे लोक प्रामाणिक आहेत ते परत येतील. जे विश्वासू नाहीत ते जातील. ही बैठक जमीनीचे वास्तव प्रकट करेल, असे गौडा म्हणाले. मी कुमारस्वामी यांना ८-९ ज्येष्ठ नेत्यांची कोअर कमिटी बनवून पक्षाच्या संघटनेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. प्रादेशिक पक्ष देशासाठी अपरिहार्य बनले आहेत. तामिळनाडूमध्ये ५० वर्षे झाली आहेत. एन. टी. रामाराव यांचा पक्ष अजूनही आहे. बिजू जनता दलाने चार वेळा विजय मिळविला आहे. ममताने दोन वेळा जिंकल्या आहेत. शिवसेना, शरद पवार, आम्ही माझ्या कुटुंबासाठी असं केलं नाही. आम्ही हे पक्ष जिवंत ठेवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख