दीप सिद्धूवर लावले पोलिसांनी एक लाखांचे ईनाम

प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांना हिंसाचारासाठी भडकविणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे ईनाम जाहीर केले आहे.
Deep Siddhu
Deep Siddhu

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांना हिंसाचारासाठी भडकविणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे ईनाम जाहीर केले आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य तीन जणांवरही ईनाम लावण्यात आले आहे. 

दोन महिन्यांच्या शांततापूर्ण आंदोलनानंतर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅलीदरम्यान झालेल्या प्रकरणात पोलिसांनी बावीस गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकला. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. 

या आंदोलना दरम्यान काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात पोहचले. लाल किल्ल्यावर चढून त्यांनी तिरंग्या व्यतिरिक्त अन्य ध्वज फडकावला. त्यावरून आता शेतकरी आंदोलकांवर टीका होत आहे. जे शेतकरी लाल किल्ल्यावर गेले त्यांच्यात दीप सिद्धूचाही समावेश होता. शेतकऱ्यांना वास्तविक लाल किल्ल्यावर जायचे नव्हते. मात्र, दीप सिद्धूनेच त्यांना भडकावले, असा आरोप आहे. तो व त्याचे साथीदार जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुजरात सिंग यांच्यावर एक लाख रुपयांचे, तर जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर प्रत्येकी ५० हजार रुपयांचे ईनाम लावण्यात आले आहे.

कोण आहे दीप सिद्धू
दीप सिद्धूचा जन्म हरयाणातील मुक्तसर येथे १९८४ मध्ये झाला. तो कायदा शाखेचा पदवीधर आहे. किंगफिशर माॅडेल हंट स्पर्धेत विजयी होण्यापूर्वी त्याने काही काळ वकिलीही केली. त्याचा पहिला पंजाबी चित्रपट 'रमता जोगी' २०१५ मध्ये प्रसारित झाला. २०१८ मध्ये 'जोरा दास नंबरिया' प्रसारित झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. २०१९ मध्ये गुरुदासपूरचे भाजप खासदार व अभिनेते सनी देओल यांच्या निवडणुकीचा प्रचारही त्याने केला होता. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com