केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; दिल्लीच्या सीमा करणार बंद

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
delhi borders sealed for one week said arvind kejriwal
delhi borders sealed for one week said arvind kejriwal

नवी दिल्ली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे सरकारने राज्याच्या सीमा पुढील एका आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभर बंद राहतील. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन त्यापुढील आठवड्यात सीमी पुन्हा खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्यांपैकी सलून उघडण्यात येतील मात्र, स्पा बंद राहतील. पार्किंगची समविषम नियमानुसार रस्ताच्या बाजूची दुकाने उघडण्यात येतील. केंद्र सरकारने दुकांनाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने सर्व दुकानांना उघडण्यास परवानगी दिली जाईल. 

रिक्षा, ई-रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये आधीच्या आदेशानुसार प्रवाशांची संख्या निश्चित करण्यात आली होती. परंतु, आता आम्ही आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा, ई-रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये त्यांच्या निश्चित केलेल्या क्षमतेएवढे प्रवासी प्रवास करु शकतील, असे केजरीवाल यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. दिल्ली सरकारनेही हा निर्णय लागू केला आहे. आतापर्यंत मोटारीत चालकाव्यतिरिक्त दोन जणांना बसण्यास परवानगी होती. याचबरोबर दुचाकीवर मागे बसण्यास परवानगी नव्हती. केंद्र सरकारने हे निर्बंध काढून टाकले असून, दिल्ली सरकारनेही ते काढून टाकले आहेत, असे केजरीवाल यांनी नमूद केले. 

न्यूयॅार्क  : अमेरिकेत भडकलेला वणवा अद्याप सुरूच आहे. जॅार्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अनेक आंदोलक हे उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले आहेत. रविवारी सुरू झालेल्या या आंदोलनाची धग आता व्हाईट हाऊसपर्यंत पोहचली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविण्यात आले आहे. वॉशिंगटन, न्यूयॉर्क, न्यू जर्सी या शहरासह अमेरिकेतील चाळीस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com