दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारींना नड्डांनी हटविले !

दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी पक्षाने मोठा झटका दिला असून त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटविण्यात आले आहे.
 दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारींना नड्डांनी हटविले !

पुणे : दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी पक्षाने मोठा झटका दिला असून त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आदेश गुप्ता यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी . त्यांना हटविताना कोणतेही कारण दिले नाही आणि तसे कारणही समजू शकले नाही. 

दिल्लीत आपची सत्ता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ते चांगले पद्धतीने शह देतील अशी पक्षाची अपेक्षा होती. पण, त्यांचा केजरीवालांसमोर टीकाव लागला नाही. विधानसभा निवडणूक तर केजरीवालांनी एक हाती काढली. भाजप दिल्लीत सत्ता हस्तगत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होता मात्र केजरीवाल भाजपला भारी पडले आहेत. 

गेल्या काही महिन्यापासून तिवारींना हटविण्याची मागणी होत होती. मात्र भाजपने तातडीने निर्णय न घेता त्यांना संधी दिली होती. शेवटी नड्डा यांनी त्यांना दूर करीत गुप्ता यांना अध्यक्ष केले आहे.

नवे अध्यक्ष हे सामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत. ते महापौर होते आणि क्‍लासेस घेऊन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. जमीनीवर पाय असलेल्या गुप्ताना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणीही जोर धरत होती. 

लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने तिवारींना पोलिसांनी अलिकडेच अटकही केली होती. त्यांनी केजरीवाल सरकारविरोधात कोवीडप्रश्‍नी आंदोलन केले होते. काही असले तरी दिल्लीत झालेल्या पराभवाला त्यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आल्याचे वृत्त आहे.

दिल्लीत भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या होत्या. त्यांचे नेतृत्व दिल्लीकरांना मान्य झाले नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून ते दिल्लीकरांची मन जिंकण्यात तिवारी कमी पडल्याचेही बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com