कोव्हॅक्सिन लशीचा डोस ठरतोय 'डबल म्यूटंट' कोरोनाचा कर्दनकाळ

भारतामध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराने कहर केला आहे.
Covaxin gives protection against the new variants
Covaxin gives protection against the new variants

हैदराबाद : भारतामध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराने कहर केला आहे. B.1.617 या कोरोनाच्या 'डबल म्यूटंट' प्रकाराने जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये प्रवेश केला आहे. भारतातील कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होण्यास हाच प्रकार कारणीभूत ठरला आहे. जागतिक आरोग्य सघटनेनेही (WHO) या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. या विषाणुला 'कोव्हॅक्सिन' ही लस प्रभावहीन करत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. (Covaxin gives protection against the new variants of covid19)

भारतात सध्या इंडियन कौन्सिल फॅार मेडिकल रिसर्च व भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सिन व सिरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केली जात असलेल्या कोविशिल्ड या दोन लशींचा लसीकरण कार्यक्रमात समावेश आहे. या दोन्ही लशींमुळे कोरोना विषाणुपासून संरक्षण मिळत असल्याचे यापूर्वीच सिध्द झाले आहे. पण भारतामध्ये मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आढळून आलेल्या B.1.617 या विषाणुच्या प्रकाराने देशात धुमाकूळ घातला आहे. त्यावर या लशींच्या प्रभावाबाबत काही तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जात होती.

नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये कोव्हॅक्सिन ही लस B.1.617 या विषाणुसह ब्रिटन व अन्य काही देशांमध्ये आढळून येणाऱ्या B.1.1.7 यांसह अन्य काही विषाणुंच्या प्रकारांवर प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झालं आहे. भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. हे संशोधन राष्ट्रीय विषाणू संस्था (NIV) आणि ICMR यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत देशात १८ कोटी २२ लाखांहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यातील १८ ते ४४ वयोगटातील ४८ लाख जणांना लस देण्यात आली आहे. राज्यांना आतापर्यंत २० कोटी डोस वितरित करण्यात आले असून आज १ कोटी ८४ लाख डोस विविध राज्यांकडे शिल्लक आहेत. पुढील तीन दिवसांत ५१ लाख अतिरिक्त डोस वितरित केले जाणार असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com