सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान, एकता कपूरसह करण जोहरला दिलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये वादळ उठले आहे. या प्रकरणी सलमान खानसह आठ जणांना न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळाला आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान, एकता कपूरसह करण जोहरला दिलासा

पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान, निर्माती एकता कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि निर्माता करण जोहर यांच्या विरोधात बिहारमधील न्यायालयात खटला दाखल झाला होता. न्यायालयाने हा खटला रद्दबातल ठरविल्याने या सर्वांना दिलासा मिळाला आहे.  

मुझफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्या न्यायालयात स्थनिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी हा खटला दाखल केला होता. न्यायालयाने हा खटला रद्दबातल ठरविला असून, हा विषय न्यायालयाच्या कार्यकक्षेतील नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुशांतने 14 जूनला  आत्महत्या केल्यानंतर ओझा यांनी तीन ते चार दिवसांतच हा खटला दाखल केला होता. या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिला साक्षीदार करण्याची मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या विरोधातही मुझफ्फरपूर येथील कुंदन कुमार याने मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुशांत केवळ 34 वर्षांचा होता. त्याने अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. 

त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. 'शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटात तो वाणी कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्यासोबत दिसला होता. भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्यावरील एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने धोनीच्या भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच, आमीर खानसोबत पीके चित्रपटातील त्याची भूमिकाही नावाजली गेली होती. त्याच्या मागील काही दिवसांपूर्वी आलेला 'छिछोरे' हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. याचबरोबर 'केदारनाथ' या चित्रपटात तो सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता. 

सुशांत याची माजी व्यवस्थापिका दिशा सॅलियन हिने 8 जूनला आत्महत्या केली होती. ती ऐश्वर्या रॉय, भारती सिंह आणि वरुण शर्मा या सेलेब्रिटींचा व्यवस्थापिका होती. आता सुशांत याने आत्महत्या केल्याने याचा संबंध दिशा हिच्या आत्महत्येशी आहे का, हे पोलिस पडताळून पाहत आहेत. दिशा हिच्या मृत्यूनंतर सुशांत याने सोशल मीडियावर म्हटले होते की, ही अतिशय दु:खद बातमी आहे. मी दिशा आणि तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com