धक्कादायक : लाईव्ह व्हिडीओ बैठकीत नगरसेवकाने चक्क उरकली अंघोळ

कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारी पातळीवर सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. स्पेनमध्ये व्हिडीओ बैठकीत एका नगरसेवकाने स्नानगृहातून हजेरी लावल्याचे समोर आले आहे.
councillor in spain take bath during live official video conference meeting
councillor in spain take bath during live official video conference meeting

माद्रिद : उत्तर स्पेनमधील टॉरेलवेगा महापालिकेच्या एका नगरसेवकाने व्हिडीओ बैठकीत स्नानगृहातून शॉवर घेत असताना हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरुन उठलेल्या गदारोळानंतर या नगरसेवकाने राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. 

या आठवड्याच्या सुरुवातीला महापालिकेच्या नगरसेवकांना निधी जमा करण्यासाठी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सुमारे सहा नगरसेवकांनी हजेरी लावली होती. ही बैठक नागरिक आणि पत्रकारांसाठी लाईव्ह सुरु होती. ही बैठक दुपारनंतरही लांबली. या बैठकीला नगरसेवक बर्नाडो बस्टिलो उपस्थित होते. ते जलतरण प्रशिक्षक म्हणूनही काम करतात. त्यांची जलतरण तलावावर जाण्याची वेळ जवळ येऊ लागल्याने ते अस्वस्थ होऊ लागले. 

यावर त्यांनी नामी शक्कल लढविली. त्यांनी संगणकच स्नानगृहात नेला. त्यावरील चॅट स्क्रीन लहान करुन बैठक ऐकता येईल आणि अंघोळही करता येईल, अशी त्यांची शक्कल होती. त्यांनी अंघोळ सुरू केली त्यावेळी सहकाऱ्यांनी नदी स्वच्छतेची चर्चा सुरू केली. त्याचवेळी स्क्रीनवर नगरसेवकही अंघोळ करताना सर्वांना दिसू लागले. याचबरोबर स्नानगृहातील पाण्याचाही आवाज येऊ लागला. याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवरुन सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी मोबाईल उचलला नाही. 

अखेर स्नानगृहातून ते बाहेर आल्यानंतर त्यांचे सहकारी एकमेकांना बर्नाडो यांना घडल्या प्रकाराबद्दल सांगण्याचा आग्रह करु लागले. महापौरांनी स्वत:च पुढाकार घेऊन बैठक संपविली. बर्नाडो यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. 

याला बर्नाडो यांनी अखेर उत्तर दिले असून, ते म्हणाले की, तंत्रज्ञानातील अपुऱ्या माहितीमुळे ही घटना घडली आहे. हा अनावधानाने घडलेला प्रकार आहे. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जलतरण प्रशिक्षक असल्याने माझे अर्धे आयुष्य अर्धनग्न अवस्थेत घालवले आहे. यामुळे मला त्याचा खेद वाटत नाही. या प्रकरणी माझी राजीनामा देण्याचीही तयारी आहे. 

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त आणि भारताविरोधात नेहमीच गरळ ओकण्यासाठी प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नवा वाद निर्माण केला आहे. त्याने आज असा दावा केला आहे, की पाकिस्तानच्या संघाने भारताला अनेकवेळा मैदानात धूळ चारली आहे. हरविले आहे आणि मॅच संपली की टीम इंडिया आमची माफी मागत असे ! क्रिक कास्टच्या एका यूट्यूब शोमध्ये आफ्रिदीने भारतीय क्रिकेट टीम विषयी नको ती विधाने करून वाद ओढवून घेतला आहे. टीम इंडियाची पाकिस्तानी संघाने अशी धुलाई केली आहे की काही विचारू नका. मला नेहमीच भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना खूप मजा यायची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com