सावधान! देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय

जगातील अन्य देशांसोबतच भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.३१ लाखाहून अधिक झाली आहे.
corona patient numbers see biggest spike in india
corona patient numbers see biggest spike in india

नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले असून, १४७ जणांनी प्राण गमावले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्र सरकारने मात्र, योग्यवेळी लॉकडाउन करण्यात आल्याने रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचा दावा केला. 
आरोग्य मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख 3१ हजार ८६८ झाली असून या विषाणूमुळे आत्तापर्यंत ३ हजार८६७ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ५४ हजार ४४१ रुग्णांची प्रकृती सुधारली असून, बरे होण्याचा दर ४१.२८ टक्क्यांवर पोहोचला असल्याचेही आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आधी ३.४ दिवसांचा होता. आता हा वेग १३ दिवसांहून अधिक झाला आहे. यामध्ये लॉकडाउन आणि सुरक्षित अंतर राखणे, मार्गदर्शक सूचनांचे पालन या गोष्टींनी औषधासारखे काम केले. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातून विशेषतः: मुंबईतून वाढल्याचे दिसून आले आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या २९ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. मुंबईत मागील २४ तासांत १,५५६ रुग्ण आढळले आणि ४० जण दगावले. उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या २,४९३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३,४३३ संक्रमित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे १५५ जणांनी प्राण गमावले आहेत. 

तातडीने पायाभूत सुविधा उभ्या करा 

पुढील दोन महिने कोरोना संसर्गाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात संसर्ग आणखी वाढू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणेने आरोग्यासंदर्भात पायाभूत सुविधा उभाराव्यात अशी सूचना केंद्राने देशातील अकरा महापालिकांना केली आहे. विशेष म्हणजे या महापालिकांच्या हद्दीतच कोरोनाचे ७० टक्के एवढे रूग्ण आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांतील महापालिकांचा यात समावेश असून सध्या हीच ठिकाणे उद्रेकाची केंद्रस्थाने बनली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 


जवानांना संसर्ग 

कर्नाटकमध्ये मागील चोवीस तासांत १३० नवे रुग्ण सापडल्याने आता एकूण संख्या २०८९ झाली आहे. आत्तापर्यंत ६५४ जण बरे झाले असून राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या १३९१ आहे. केरळमध्ये देखील नवे ५३ रुग्ण सापडले असल्याने रुग्णसंख्या ३२२ झाली आहे. दरम्यान, सीमासुरक्षा दलाचे (बीएसएफ)चे आणखी दोन जवानही कोरोनामुळे संक्रमित झाल्याने कोरोनाग्रस्त बीएसएफ जवानांची संख्या ११२ झाली आहे. अर्थात, २९६ जवान खडखडीत बरेही झाले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com