भावी मुख्यमंत्रिपदावरून कॉंग्रेसमध्ये वाद; पक्षश्रेष्ठींचा आमदारांना इशारा 

मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नांतनेतेही आहेत.
भावी मुख्यमंत्रिपदावरून कॉंग्रेसमध्ये वाद; पक्षश्रेष्ठींचा आमदारांना इशारा 
Controversy in Congress over future chief minister; Party leaders warn MLAs

बंगळूर : एकीकडे  कर्नाटक राज्य कोरोना महामारीने हैराण झालेले असतानाच राज्यातील राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार नेतृत्वावरून वाद घालीत आहेत. मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नांत दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही आहेत. (Controversy in Congress over future chief minister; Party leaders warn MLAs)

भाजपमधील नेतृत्वाचा वाद काहीसा शांत झालेला असताना आता भावी मुख्यमंत्री कोण? यावरून कॉंग्रेस आमदारांमध्ये वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार भलतेच अस्वस्थ झाले. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर रणदीपसिंग सुरजेवाला यांनी याची गांभिर्याने दखल घेतली. राज्याचे आमदार व नेत्यांना इशारावजा संदेश पाठविला आहे.

प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी जमीर अहमद खान आणि राघवेंद्र इटनाळ यांना सिद्धरामय्या हे पुढचे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर वक्तव्य केल्याबद्दल इशारा दिला आहे. एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात कॉंग्रेस नेतृत्वावरून काही लोक जाहीर वक्तव्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जेव्हा पक्षाला संधी मिळते, तेव्हा पक्षाचे हायकमांड व आमदार नेतृत्त्वाबाबत निर्णय घेतील. नेतृत्वाबाबत आतापासूनच कुणीही कोणत्याही प्रकारचे विधान करू नयेत, अशी ताकीद सूरजेवाला यांनी दिली आहे.

भ्रष्टाचारी भाजप सरकारविरूद्ध कॉंग्रेस आंदोलन करीत आहे. अशा वेळी कॉंग्रेसचा भावी मुख्यमंत्री कोण याबाबत आतापासूनच जाहीर वक्तव्य करू नये, अशी सूचना सुरजेवाला यांनी कोणा आमदाराचे नाव न घेता केली आहे. कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी संघर्ष केला पाहिजे. महाभारताच्या अर्जुनाप्रमाणे लढा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in