निर्मलाताई मंदी लायी...!

देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन काँग्रेसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले आहे. देशाच्या आर्थिक स्थितीत सीतारामन यांच्या काळात घसरण सुरूच असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
congress targets finance minister nirmala sitharaman
congress targets finance minister nirmala sitharaman

नवी दिल्ली : देशातील प्रत्यक्ष कर संकलनात मागील आर्थिक वर्षामध्ये (2019-20) तब्बल 4.92 टक्के घसरण होऊन ते 12.33 लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायांना फटका बसला आहे. याचाच परिणाम होऊन देशात आर्थिक मंदी आली असून, या मुद्द्यावरुन काँग्रेसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. 'निर्मलाताई मंदी लायी' अशी मोहीम काँग्रेसने सोशल मीडियावर सुरू केली आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, चालू वर्षात बँकांच्य़ा कर्जाच्या वितरणातील वाढ केवळ शून्य ते एक टक्का आहे. यातून असे दिसते की बँका कोणाला कर्ज देत नाहीत अथवा कोणी बँकांकडून कर्जच घेत नाही. त्यामुळे दिसते त्यापेक्षा परिस्थिती भयानक आहे. भाजप सरकारने एवढे मोठे पॅकेज दिले की बँका हे पैसे लोकांपर्यंत पोचवतील. मात्र, बँका कर्ज देण्याऐवजी त्यांचा पैसा रिझर्व्ह बँकेकडे जमा करीत आहेत. ही परिस्थिती ओढवण्याचे कारण आहे गरीबांकडे पैसे नाहीत. लॉकडाउनमुळे गरीबांकडे पैसाच नाही. सरकारने लॉकडाउनचे अतिशय चुकीचे पाऊल उचलले. 

काँगेसने ट्विटरवर म्हटले आहे, की केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली मात्र, यात प्रसिद्धीचाच भाग अधिक होता. गरीब आणि उद्योगांना मदत करण्याविषयी यात काहीच नव्हते. कोरोना संकटाच्या काळात अन्नधान्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. खाद्यपदार्थांची महागाई मे महिन्यात वाढून 9.28 टक्क्यांवर पोचली आहे. याचवेळी सरकारने एप्रिलमधील महागाईचे आकडेच जाहीर करण्यास नकार दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरू असून, यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारकडे आता पैसेच नसल्याने इंधनावरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. कोरोना संकटात जनतेला दिलासा देण्याऐवजी जनतेची लूट हे सरकार करीत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com