गोव्यात काँग्रेसमुळे भाजपचे सरकार आले : प्रफुल्ल पटेल

राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास व निवडणुकीनंतरही सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने केलेल्या विलंबामुळे भाजप सरकार सत्तेवर आले. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी गोव्यात काँग्रेस सरकार वाचविण्याचे काम केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणी, हेतू व कोणत्या दिशेने जावे हे कोणा पक्षाला आम्हाला सांगण्याची गरज नाही असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले
Praful Patel
Praful Patel

पणजी : "राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास व निवडणुकीनंतरही सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने केलेल्या विलंबामुळे भाजप सरकार सत्तेवर आले. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी गोव्यात काँग्रेस सरकार वाचविण्याचे काम केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणी, हेतू व कोणत्या दिशेने जावे हे कोणा पक्षाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. गोव्यात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्याचा तसेच नव्या भारताचा गोवा हा आदर्श चेहरा असायला हवा," असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.

राजधानी पणजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्‍घाटननंतर आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "गोव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीपूर्वी काँग्रेसने युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व मी स्वतः चर्चा केली होती मात्र शेवटपर्यंत काँग्रेसने झुलवत ठेवत निर्णय घेतला नाही. निवडणुकीनंतरही काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचे ठरविले होते. मात्र काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदामुळे भाजपने बाजी मारली,"

पटेल पुढे म्हणाले, "काँग्रेसने जर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणुकीपूर्वी युती केली असती बहुमत मिळाले असते व कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासली नसती. काँग्रसने तर गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली याचा मी साक्षीदार आहे. यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने धडा घेतला आहे,'' असे पटेल म्हणाले. 

''राज्यातील लोक भाजप सरकारला कंटाळलेले आहेत. काँग्रेस पक्ष स्वबळावर लढून सरकार स्थापन करू शकत नाही. भाजपला हद्दपार करण्यासाठी समविचारी राजकीय पक्षांबरोबर युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असेल, मात्र स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीही पक्षाने सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसला ‘ऑफर’ होती मात्र ती धुडकावून लावण्यात आली. ऑफर स्वीकारली असती तर ज्या कारणासाठी काँग्रेसशी युती केली त्याचे उद्दिष्ट्यच नष्ट झाले असते," असेही ते म्हणाले.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीतील पूर्ण राज्यात दौरा केला. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेसला जादा जागा देऊन समझोता केला. काँग्रेसला उमेदवारीच्या जादा जागा दिल्या. निवडणुकीनंतर मात्र राष्ट्रावादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यांच्या पुढाकारमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यातून पवार यांची असलेली ताकद दिसून येते,'' असेही पटेल यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com