काँग्रेस मोदींना विचारतेय....'त्या' युद्धाचे काय झाले?

देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने कॉंग्रेस नेते आक्रमक झाले आहे. त्यांनी आज दिवसभरात केंद्र सरकारवर ट्विटच्या माध्यमातून वाग्बाण सोडले. प्रत्येकाचे लसीकरण हा देशातील नागरिकांचा हक्क आहे, असे सांगत सर्वांसाठी लस यासाठी जनतेने आवाज उठावावा, असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियांका वद्रा यांनी केले,
Priyanka Gandhi - Narendra Modi- Rahul Gandhi
Priyanka Gandhi - Narendra Modi- Rahul Gandhi

नवी दिल्ली  : देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने कॉंग्रेस नेते आक्रमक झाले आहे. त्यांनी आज दिवसभरात केंद्र सरकारवर ट्विटच्या माध्यमातून वाग्बाण सोडले. प्रत्येकाचे लसीकरण Corona Vaccine हा देशातील नागरिकांचा हक्क आहे, असे सांगत सर्वांसाठी लस यासाठी जनतेने आवाज उठावावा, असे आवाहन काँग्रेस Indian National Congress नेत्या प्रियांका वद्रा Priyanka Vadra  यांनी केले, तर पोकळ दावे आणि भाषणबाजीतून कोरोनाचा सामना करता येणार नाही, अशी टीका खासदार पी. चिदंबरम P Chidambaram यांनी केली आहे. Congress Leaders Tweeted Against Narendra Modi about Corona Situation

प्रियांका यांनी एका व्हिडिओसह ‘ट्विट’ केले आहे. व्हिडिओमध्ये देशातील रुग्णसंख्येत होणारी वाढ, अपुऱ्या पडणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि केंद्र सरकारकडून निर्यात केली जाणारी लस यावर भाष्य केलेले आहे. लस ही प्रत्येकासाठी आहे, सरकारने ‘इव्हेंट’ आयोजित करण्यापेक्षा लोकांच्या गरजांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. ‘पीएम केअर फंड’ कुठे खर्च केला जातो, हेही जाणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. लसीची निर्यात करण्यापेक्षा सरकारने प्रत्येक भारतीयाचे लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी देखील ट्विट करीत, कोरोनाशी लढण्यासाठी देशाला लसीची गरज आहे. प्रत्येकाला सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही देखील आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन जनतेला केले आहे. या दोन्ही नेत्यांनी सर्व भारतीयांच्या लसीकरणासाठी मर्यादित कालावधी निश्‍चित करावा, तसेच लसीच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

चिदंबरम यांनी ‘ट्विट’ केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना त्यांनी म्हटले आहे, की पोकळ दावे आणि भाषणबाजीतून कोरोना सारख्या विषाणूविरोधातील लढ्याला यश मिळणार नाही. केंद्र सरकार लसीकरण आणि लसीच्या सुयोग्य वितरणामध्ये आलेले अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘‘केंद्र लसीकरणाला एक दिवस उत्सव म्हणते, तर दुसऱ्या दिवशी सर्वांत मोठा लढा असा त्याचा उल्लेख करते, हे काय आहे?,’’ असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. Congress Leaders Tweeted Against Narendra Modi about Corona Situation

‘त्या’ युद्धाचे काय झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी पहिल्यांदा लॉकडाउनची घोषणा केली, त्यावेळी कोरोनाविरोधातील हे युद्ध २१ दिवसांत संपेल, असा विश्‍वास त्यांनी जनतेला दिला होता. महाभारताच्या युद्धाचा दाखला त्यावेळी दिला होता. त्या युद्धाचे काय झाले, असा प्रश्‍न करीत चिदंबरम यांनी सरकारी धोरणांवर टीका केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com