राजस्थान सरकारवरील संकट टाळण्यासाठी संकटमोचक माकन, सुरजेवाला

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षातील वाद शमण्याची चिन्हे नसून, सचिन पायलट यांच्याशी पक्षाला संपर्कही करता येत नसल्याचे समोर आले आहे. आता पक्षाने अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांना तातडीने पाठविले आहे.
congress leaders ajay maken, randeep surjewala sent to jaipur as central observers
congress leaders ajay maken, randeep surjewala sent to jaipur as central observers

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. याचवेळी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील वादळ शमविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींनी अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला केंद्रीय निरीक्षक म्हणून राजस्थानला पाठविले आहे. संकटातील राजस्थानला सरकार हे संकटमोचक तारू शकतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.   

उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गेहलोत यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आज रात्री बोलाविली आहे. या बैठकीला सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही पाचारण करण्यात आले आहे. 

पायलट यांनी उघडपणे संघर्षाची भूमिका घेतल्याने राज्य पातळीवर सर्व सूत्रे गेहलोत यांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. याचाच भाग म्हणून आमदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठक आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. अनेक मंत्री आणि आमदारांनी गेहलोत यांना दूरध्वनी करुन पाठिंबा दर्शविला आहे. याचबरोबर गेहलोत यांनी उद्या सकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे उपस्थित राहणार आहेत. 

गेहलोत आज रात्री आमदारांची बैठक बोलाविलेली असतानाच पक्ष नेतृत्वाने दिल्लीतून ज्येष्ठ नेते अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांना राजस्थानला पाठविले आहे. या दोन्ही नेत्यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. बैठकीत हे नेते आमदारांशी संवाद साधतील. याचबरोबर राज्यातील राजकीय संकट दूर करण्याचा प्रयत्न करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांच्यासोबत 19 आमदार आहेत. 

राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदाव्यांबाबत माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले होते की, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अनेकांची असते. आमच्या पक्षात पाच ते सात जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परंतु, जेव्हा पक्ष निर्णयानुसार एक जण मुख्यमंत्री होतो तेव्हा अन्य जण त्याला पाठिंबा देत असतात. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. सर्व शांतता आहे. 

जेव्हा एकाला मुख्यमंत्री केले जाते तेव्हा अन्य इच्छुकांनी शांत बसणे अपेक्षित असते, असे सांगत अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांना प्रदेश अध्यक्ष व उपमुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा दबाब आणू शकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे झाले तर राजस्थानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलविली होती. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीला गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक मुद्दावर आपले मत मांडले पण सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत अनेक प्रश्न निर्माण केले.    

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com