congress leader rahul gandhi targets narendra modi over chinas incursion in ladakh
congress leader rahul gandhi targets narendra modi over chinas incursion in ladakh

खोटं कोण बोलतंय...पंतप्रधान मोदी की लडाखमधील जनता? राहुल गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखला अचानक दिलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले आहे. चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरुन मोदींवर टीका करण्यात आली आहे.

 नवी दिल्ली : चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत. याचवेळी लडाखमधील जनता म्हणतेय चीनने घुसखोरी केली. यामुळे नेमके खोटे कोण बोलत आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक लडाखला भेट दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदींची पुन्हा कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

राहुला गांधी यांनी ट्विटरवर मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी काही लडाखी नागरिकांचा व्हिडीओही शेयर केला आहे. यात लडाखी नागरिक चीनने घुसखोरी केल्याचे सांगत आहेत. राहुल यांनी म्हटले आहे की, लडाखी जनता म्हणते, चीनने आमची भूमी बळकावली. पंतप्रधान म्हणतात, आपली भूमी कोणीही बळकावली आहे. याचाच अर्थ कोणी तरी खोटे बोलत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक लडाखमधील भारत-चीन यांच्यातील नियंत्रण रेषेला भेट देऊन तेथे तैनात असलेल्या लष्करी जवान व अधिकाऱ्यांची चर्चा केली. पंतप्रधानांनी या भेटीत सीमेवरील घडामोडींचा आढावा घेतला आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.  त्यानंतर त्यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्या या दैाऱ्याचे आयोजन केले होते. 

मोदी म्हणाले, ''भारत सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाने भारताच्या लष्कराचे सामर्थ्य ओळखले आहे. भारताने सीमेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. सीमेवरील रस्ते, पुल उभारण्याचे काम सुरू आहे. सीमाच्या विकासनिधीत तीन पट वाढ केली आहे. भारताची ताकद सर्वच क्षेत्रात वाढत आहे. भारतीय जवानांची ताकद हिमालयापेक्षाही मजबूत आहे. शैार्य, सन्मान, मर्यादा आणि विश्वास हे चार गुण लष्करामध्ये प्रतिबिंबित होत असतात. भारतीय जवान याच मार्गावर जात आहे. देशाची सेवा करीत आहेत. विकासवाद हाच भविष्याचा आधार आहे, असे मोदी यांनी नमूद केले.  

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिनसिंग रावत व लष्कर प्रमुख जनरल मनोज  नरवणे हे त्यांच्यासोबत आहेत. आज सकाळी पंतप्रधान लेहला पोहोचले. त्यानंतर ते सीमेवरील निमू येथे गेले. तेथे त्यांनी भारतीय लष्कर, भारतीय वायूदल आणि इंडो-तिबेट सीमा दलाच्या अधिकारी व जवानांशी चर्चा केली. भारत आणि चीनमध्ये लडाखधील डोंगराळ भागात कायम तणावाचे वातावरण असते. मात्र, 15 जूनला झालेला संघर्ष हा मागील 50 वर्षांत झालेला सर्वांत भीषण ठरला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मागील महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र, 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. यात चीनचेही काही सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. मात्र, नेमकी संख्या लष्कराने जाहीर केलेली नाही. चीनच्या सैन्यानेही त्यांच्या ठार झालेल्या जवानांचा आकडा सांगितलेला नाही. 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. तसेच, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात चीनचे सुमारे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com