मी महाराजा नाही, मी मामाही नाही अन् मी चहाही विकला नाही...

मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतरही काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष शमण्याची चिन्हे नसून, तो आणखी चिघळत आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
congres leader slams bjpl leader jyotiraditya shinde and shivraj singh chauhan
congres leader slams bjpl leader jyotiraditya shinde and shivraj singh chauhan

भोपाळ :  मी महाराजा नाही, मी मामाही नाही, मी चहाही विकला नाही, मी तर फक्त कमलनाथ आहे, असा टोला काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात सत्तापालट झाला आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे.  

काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'टायगर जिंदा है', असे वक्तव्य केले होते. शिंदे यांच्या समर्थकांना काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात चांगले स्थान मिळाले आहे. शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख हा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे होता. याला कमलनाथ यांना आज प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी महाराजा नाही, मी मामाही नाही, मी कधीही चहा विकला नाही, मी तर फक्त कमलनाथ आहे. मी टायगर आहे, असे लोक म्हणतात. मी खरेतर टायगर नाही आणि कागदी टायगरही नाही. आता राज्यातील जनताच ठरवेल कोण नेमका काय आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनीही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, एका जंगलात फक्त एकच वाघ राहू शकतो.  जेव्हा वाघाची शिकार करण्यास बंदी नव्हती, तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांच्यासमवेत मी वाघाची शिकार केली आहे. वेळ मोठी ताकदवान असते. भारतीय जनता पक्षाचे भविष्य. या मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपचे किती वाघ जागे केले आहेत, ते फक्त बघत राहा. वाघाचे खरे जीवन आपल्याला माहिती आहे का? एका जंगलात फक्त एकच वाघ राहू शकतो.

राज्यात तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिंदे यांच्यासमवेत काँग्रेसचे 23 आमदार भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पडले होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा भाजपचे शिवराजसिंह चौहान यांनी हाती घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com