कोरोनावरील औषधावरुन योगगुरू रामदेवबाबा अडचणीत

रामदेवबाबा यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषधाचा दावा करणे महागात पडण्याची चिन्हे आहेत. यामुळे रामदेवबाबा यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
complaint filed in court against ramdevbaba over corona medicine
complaint filed in court against ramdevbaba over corona medicine

मुझफ्फरपूर : कोरोनावरील उपचारासाठी औषध बनविल्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी योगगुरू रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण आडचणीत आले आहेत. या दोघांनी बनावट औषधाचा दावा करुन लाखो लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिहारमधील न्यायालयात  फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

तमन्ना हाश्मी या सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. फसणवणूक, गुन्हेगारी कट आणि इतर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. ही तक्रार मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी 30 जूनला सुनावणी ठेवली आहे. या तक्रारीत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटचे संयोजक रामदेवबाबा आणि त्यांचे सहकारी व संस्थेचे अध्यक्ष बालकृष्ण या दोघांची नावे आहेत. 

रामदेवबाबा आणि बालकृष्ण यांनी कोरोनावरील उपचारासाठी कोरोनिल या गोळ्यांची निर्मिती केल्याचा खोटा दावा केला होता. आयुष मंत्रालयानेही पतंजली आयुर्वेदला या औषधाची जाहिरात थांबवून ते कोरोनावर परिणामकारक आहे, असा दावा करणे थांबविण्याचे निर्देश दिले आहेत, असे हाश्मी यांनी म्हटले आहे. 

रामदेवबाबा  यांच्या पतंजली संस्थेने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला असून, त्याची जाहिरातही  सुरू केली. या औषधातील घटक आणि चाचण्यांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने अखेर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आयुष मंत्रालयाने या औषधाबाबात हात झटकले आहेत. या औषधातील घटकाची पूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत त्याची कोरोनावरील औषध अशी जाहिरात करु नये, असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत. 

पतंजलीने आज कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल आणि श्‍वासारी अशी या औषधांची नावे आहेत. पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार, देशात २८० रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. या औषधाच्या दोन टप्प्यांत चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पतंजली संशोधन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि निम्स विद्यापीठ, जयपूर या संस्थांनी एकत्र येऊन या औषधांसाठी संशोधन केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com