परदेशी प्रवाशांसाठी क्वारंटाइनचे असे आहेत नियम

परदेशी प्रवाशांना क्वारंटाइन करण्यावरुव उठलेल्या गदारोळानंतर केंद्र सरकारने यावर नियमावली जाहीर करुन पडदा टाकला आहे. यात काही प्रकारच्या प्रवाशांनी मात्र, सवलत देण्यात आली आहे.
central government issues advisory for foreign travelers
central government issues advisory for foreign travelers

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा ऑगस्टपूर्वी सुरू करण्याचे सूतोवाच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी केली आहे. या प्रवाशांना भारतात येताच 14 दिवसांपर्यंत विलगीकरणात (क्वारंटाइन) राहावे लागणार आहे. यातील सात दिवस स्वखर्चाने विलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक असेल. उर्वरित सात दिवस घरी विलगीकरणात राहता येईल.

आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करताना काही श्रेणीतील प्रवाशांना क्वारंटाइन केंद्रात राहण्याच्या अटीतून वगळण्यात आले आहे. यात मानसिक आजारपण, गरोदर महिला, कुटुंबातील सदस्याचे निधन झाले असल्यास, गंभीर आजार तसेच दहा वर्षांपेक्षा कमी वयाची बालके यांना चौदा दिवसांपर्यंत होम क्वारंटाईनची परवानगी दिली जाऊ शकते. प्रवासादरम्यान आणि नंतर काय करावे तसेच काय करू नये याची यादी प्रवाशांना तिकिटासोबतच दिली जाईल. सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. 

हे अनिवार्य 

- विमान तसेच जलमार्गाने प्रवासापूर्वी प्रवाशांचे स्क्रिनिंग 
- लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी 
- रस्त्याने येणाऱ्यांसाठी नियम पाळावे लागणार 
- कोणताही आजार नसलेल्यांनाच देशात प्रवेश 
- स्वतःचे तपशील जहाजावर, विमानात भरणे बंधनकारक 
- तपशिलाची प्रत आरोग्य, इमिग्रेशन अधिकाऱ्याला द्यावी 
- विमानतळावर प्रवाशांचे निर्जंतुकीकरण 
- विमानात प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावे लागणार 

देशांतर्गत प्रवासासाठी सूचना 

- क्वारंटाइन, विलगीकरणाचे स्वतंत्र 
- नियम बनविण्याची राज्यांना मुभा 
- कोरोनाचे लक्षण नसलेल्या प्रवाशांना विलगीकरणाची गरज नाही. 
- चौदा दिवसांसाठी स्वतःला एकांतवासात राहावे लागेल. 
- विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग 
- घरी लक्षणे आढळल्यास देखरेख केंद्राला माहिती द्यावी लागणार 
- गंभीर लक्षणे आढळल्यास विशेष रुग्णालयात उपचार 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com