central government bans popular chinese 59 apps including tiktok and share it | Sarkarnama

टिकटॉक, शेअरइटसह 59 चिनी अॅप्सवर बंदी; मोदी सरकारचा दणका

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. यामुळे सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीच कार्यवाही करीत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. आता केंद्र सरकारने लोकप्रिय टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. 

चिनी अॅप देशाच्या सार्वभौमतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर ते देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यामुळे अशा चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्रालयाने दिली. गल्वान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी होत होती. याचबरोबर  चिनी अॅप्सवर बहिष्कार घालण्याची मागणीही जोर धरत होती. तसेच, केंद्र सरकारने अनेक चिनी कंपन्यांकडून पीएमकेअर्स फंडासाठी देणग्या घेतल्याचे समोर आले होते. यावरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले होते.

बंदी घालण्यात आलेली अॅप्स :  
1. Tik Tok

2. Shareit

3. Kwai

4. UC Browser

5. Baidu map

6. Shein

7. Clash of Kings

8. DU battery saver

9. Helo

10. Likee

11. YouCam makeup

12. Mi Community

13. CM Browser

14. Virus Cleaner

15. APUS Browser

16. ROMWE

17. Club Factory

18. Newsdog

19. Beauty Plus

20. WeChat

21. UC News

22. QQ Mail

23. Weibo

24. Xender

25. QQ Music

26. QQ Newsfeed

27. Bigo Live

28. SelfieCity

29. Mail Master

30. Parallel Space

31. Mi Video Call - Xiaomi

32. WeSync

33. ES File Explorer

34. Viva Video - QU Video Inc

35. Meitu

36. Vigo Video

37. New Video Status

38. DU Recorder

39. Vault- Hide

40. Cache Cleaner DU App studio

41. DU Cleaner

42. DU Browser

43. Hago Play With New Friends

44. Cam Scanner

45. Clean Master - Cheetah Mobile

46. Wonder Camera

47. Photo Wonder

48. QQ Player

49. We Meet

50. Sweet Selfie

51. Baidu Translate

52. Vmate

53. QQ International

54. QQ Security Center

55. QQ Launcher

56. U Video

57. V fly Status Video

58. Mobile Legends

59. DU Privacy

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख