जीएसटी -केंद्राकडून महाराष्ट्रासह अन्य राज्यांना जीएसटीचा 18 वा हप्ता जारी

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी केंद्राने आज महाराष्ट्रासह 23 राज्यांना सुमारे 4000 कोटी रूपयांचा 18 वा हप्ता वितरीत केला. जाएसटी परिषदेचे सदस्य असलेल्या दिल्ली, जम्मू-काश्‍मीर व पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशांना 322 कोटींहून जास्त रक्कम देण्यात आली. यातून महाराष्ट्रालाही पैसे मिळाले आहेत.
GST
GST

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी केंद्राने आज महाराष्ट्रासह 23 राज्यांना सुमारे 4000 कोटी रूपयांचा 18 वा हप्ता वितरीत केला. जाएसटी परिषदेचे सदस्य असलेल्या दिल्ली, जम्मू-काश्‍मीर व पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशांना 322 कोटींहून जास्त रक्कम देण्यात आली. यातून महाराष्ट्रालाही पैसे मिळाले आहेत.

जीएसटी नुकसानभरपाईपोटी केंद्रातर्फे राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना साधारणतः दर आठवड्याला नुकसान भरपाई देण्यात येते. आज 3 हजार 677 कोटी रूपयांचा 18 वा हप्ता देण्यात आला. आतापावेतो राज्यांना जीएसटी नुकसान भरपाईच्या 94 टक्के रक्कम देण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी राज्यांना 95 हजार 138 कोटी तर केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 8 हजार 861 कोटी रूपये केंद्राकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात 1 लाख 13 हजार 143 कोटी रूपयांचे जीएसटी संकलन झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. कोरोना महामारीमुळे बसलेल्या आर्थिक फटक्‍यातून सावरताना देशात सलग पाचव्या महिन्यात जीएसटीचे संकलन 1 लाख कोटी रूपयांहून जास्त झाल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत जीएसटी संकलनात 7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फेब्रुावारीत केंद्राच्या तिजोरीत जमा झालेल्या संकलनापैकी केंद्रीय सीजीएसटी - 21,092 कोटी, राज्यांचा एसजीएसटी-27,273कोटी, समन्वित आयजीएसटी -55,253 कोटी (यातील 24,382 कोटींची वसुली इम्पोर्टेड सामानावरील) व सेस पोटी 9525 कोटी अशी वर्गवारी असल्याचे सांगण्यात आले.

काही राज्यांना देण्यात आलेला एकूण जीएसटी (आकडे कोटी रूपयांत)
महाराष्ट्र- 11,954.02
कर्नाटक- 12,383
गुजरात - 9204.31
पश्‍चिम बंगाल - 3468.33
तमिळनाडू- 6229.05
दिल्ली - 5853.76
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com