भाजप सरकार अडचणीत आले अन् सीबीआय चौकशीत अडकले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री

सरकारी निधीचा अपहार केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह यांची आज सीबीआयने चौकशी केली. राज्यातील सरकार अडचणीत आलेले असताना नेमकी ही चौकशी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
cbi questions ex chief minister of manipur o ibobi singh for 3 hours
cbi questions ex chief minister of manipur o ibobi singh for 3 hours

नवी दिल्ली : राज्याच्या विकासाठीच्या निधीतील 332 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह यांची आज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन तास कसून चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील भाजप आघाडीचे सरकार संकटात आल्याने ओ इबोबी सिंह यांची चौकशी करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. 

सीबीआयने या प्रकरणी निवृत्त सनदी अधिकारी व मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीचे माजी अध्यक्ष ओ नबकिशोरसिंह यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले आहे. मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी इबोबीसिंह आणि नबकिशोरसिंह यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. काल सीबीआयचे पथक इम्फाळमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आज इबोबीसिंह यांची चौकशी केली.

राज्यातील भाजपच्या आघाडी सरकारने विनंती केल्यानंतर सीबीआयने हे प्रकरण गेल्या वर्षी 20 नोव्हेंबरला तपासासाठी घेतले होते. राज्यातील सरकार अडचणीत येण्याची आणि चौकशीची वेळ एकच कशी याबद्दल सीबीआय अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. यावर ही चौकशी सध्या सुरू असलेल्या तपासाचा भाग असून, त्याचा राज्यातील घडामोडींशी काहीही संबंध नाही, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले आहे. सरकारचा पाठिंबा 9 आमदारांनी काढून घेतल्याने राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार आमदारांना भाजपने काल दिल्लीला नेले होते. दिल्लीत त्यांच्याशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली आहे.  

मुझफ्फरपूर : कोरोनावरील उपचारासाठी औषध बनविल्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी योगगुरू रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण आडचणीत आले आहेत. या दोघांनी बनावट औषधाचा दावा करुन लाखो लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिहारमधील न्यायालयात  फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तमन्ना हाश्मी या सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. फसणवणूक, गुन्हेगारी कट आणि इतर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.  न्यायालयाने या प्रकरणी 30 जूनला सुनावणी ठेवली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com