सीबीआय चौकशी झाली पाहिजे, सुशांतच्या वडलांची नितीशकुमारांकडे मागणी  - CBI probe should be done, Sushant's father demands from Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआय चौकशी झाली पाहिजे, सुशांतच्या वडलांची नितीशकुमारांकडे मागणी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

आतापर्यंत सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी कोणती चौकशी करावी हे स्पष्ट केले नव्हते. पण, काही वेळापूर्वी ते नितीशकुमार यांच्याशी बोलले आहेत.

पुणे : " अभिनेता सुशांत रजूपतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी सुशांतच्या वडलांनी आज नितीशकुमार यांच्याकडे केली आहे. 

त्यांच्यापाठोपाठ सुशांतचे वडीलांनी थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीच चर्चा केली आहे. त्यांनी यापूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

सुशांत आत्महत्याप्रकरणी बिहारमध्ये सर्वच पक्षांचे नेते आक्रमक झाले असून या प्रकरणावर सर्वच पक्ष एकत्र झाले आहेत. सर्वचजण एकमुखी मागणी करीत आहेत की सीबीआय चौकशी व्हावी म्हणून. 

आतापर्यंत सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी कोणती चौकशी करावी हे स्पष्ट केले नव्हते. पण, काही वेळापूर्वी ते नितीशकुमार यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी करतानाच तसा आदेश द्यावर अशी विनंती केली आहे.

याबाबत नितीशकुमार कोणता निर्णय घेतात याकडे बिहारचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. बिहारचे आयपीएस अधिकारी मुंबईत आले असता त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. यावरून नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. 

आज बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी सुशांत रजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,"" महाराष्ट्र सरकारने आपच्या आयपीएस अधिकाऱ्यांना जबरदस्तीने कोरोन्टाईन केले आहे. मुंबई पोलिसांविषयी महाराष्ट्र सरकारला जर इतकाच अभिमान आहे तर त्यांनी गेल्या पन्नास दिवसात कोणता तपास केला हे स्पष्ट केले पाहिजे. मुंबईने आमच्याशी संवादच थांबविला आहे. याचा अर्थ काही तरी चुकीचे घडतेय असे मला वाटते. '' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख