'या' तीन नेत्यांच्या निवडणूक शपथपत्रांची तपासणी शक्य! - CBDT To Probe Election Affidavits of Three Leaders from Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

'या' तीन नेत्यांच्या निवडणूक शपथपत्रांची तपासणी शक्य!

वृत्तसंस्था
रविवार, 20 सप्टेंबर 2020

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी भूमीका केंद्रीय निवडणूक आयोगाने जून महिन्यात घेतली होती. त्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी तक्रारदारांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागावी, अशी भूमीका आयोग घेत असे

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातला मालमत्तेचा तपशील तपासण्याची विनंती निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (CBDT) केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांच्या मालमत्ता, कर्जे आणि अन्य तपशील तपासावा, असे सीबीटीली सांगण्यात आले आहे. 

या नेत्यांनी दिलेल्या शपथपत्रांबद्दल काही तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही विनंती करण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी भूमीका केंद्रीय निवडणूक आयोगाने जून महिन्यात घेतली होती. त्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी तक्रारदारांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागावी, अशी भूमीका आयोग घेत असे. 

जर एखाद्या उमेदवारांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात दिलेली माहिती चुकीची आहे, असे आढळून आले तर आम्ही त्याबाबत फिल्ड अधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार दाखल करण्याचे आदेश देऊ, तसेच संबंधित उमेदवाराच्या राजकीय पक्षाला तसेच हा उमेदवार ज्या सभागृहात निवडला गेला आहे त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनाही याबाबत कळविण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख