बुरुंडीच्या अध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय - burundi president dies after cardiac arrest | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बुरुंडीच्या अध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जून 2020

पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी देशाचे अध्यक्ष पिएरे कुरुनझिझा यांच्या आज हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

गिटेगा : पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी या देशाचे अध्यक्ष पिएरे कुरुनझिझा यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यामुळे सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, सर्व सरकारी कार्यालयांवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले. कुरुनझिझा ऑगस्ट महिन्यात पदावरुन पायउतार होणार होते. त्यांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर देशात कोणतेही निर्बंध घालण्यास कुरुनझिझा यांनी नकार दिला होता. याचबरोबर क्रीडा स्पर्धा आणि राजकीय सभा घेण्यासही त्यांनी परवानगी दिली होती. सरकारने त्यांच्या मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे म्हटले असले तरी अनेक माध्यमांनी त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांनी केनियाची राजधानी नैरोबी येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. 

कुरुनझिझा हे 55 वर्षांचे होते. ते 2006 पासून देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, कुरुनझिझा यांच्या उमेदवारीविरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर बळाचा वापर करण्यात आला होता. यात अनेक आंदोलकांचा बळी गेला होता. लष्कराने त्यांच्याविरोधात सन 2015 मध्ये बंडाचा प्रयत्न केला होता. तो त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला होता. कुरुनझिझा सरकारच्या दबावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाचे बुरुंडीमधील कार्यालय बंद करावे लागले होते. 

कुरुनझिझा मे महिन्या झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी उभे राहिले नव्हते. या निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे उमेदवार इवारिस्ते दायिशिमिए यांचा विजय झाला. कुरनझिझा यांनी निवडणुकीआधी ते पुन्हा अध्यक्षपदाच्या रिगणात उतरणार नाहीत, असे जाहीर केले होते. सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत 68 टक्के मते मिळाली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख