Breaking : पाकिस्तान स्टाॅक एक्श्चेंजवर दहशतवादी हल्ला

कराचीच्या स्टाॅक एक्श्चेंजवर काही वेळापूर्वी दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात व चकमकीत एका नागरिकासह पाच अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
Terror Attack on Pakistan stock Exchange
Terror Attack on Pakistan stock Exchange

कराची : कराचीच्या स्टाॅक एक्श्चेंजवर काही वेळापूर्वी दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात व चकमकीत एका नागरिकासह पाच अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. 

पाकिस्तानच्या जीओ न्यूजच्या वृत्तानुसार स्टाॅक एक्श्चेंजच्या इमारतीत बंदूका आणि हँडग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला आहे. यात दोन नागरिक ठार झाले आहेत. या वृत्तानुसार काही वेळापूर्वी चार अतिरेकी पाकिस्तानी स्टाॅक एक्श्चेंजच्या इमारतीत चार दहशतवादी घुसले व त्यांनी हल्ला केला. सध्या अतिरेकी व सुरक्षा दले यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे. 

पाकिस्तानी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार हे अतिरेकी स्टाॅक एक्श्चेंजच्या इमारतीत मुख्य दरवाजातून शिरले व त्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरु केला. हँडग्रेनेड्सही फेकले. पोलिसांनी व पाक रेजर्सनी लगेचच हा परिसर सील केला. चार अतिरेकी ठार करण्यात आले असले तरी एक अतिरेकी अद्याप इमारतील लपला असल्याचा संशय आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com