ताज महालात बाँबच्या अफवेने खळबळ - Bomb Hoax at Taj Mahal in Agra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज महालात बाँबच्या अफवेने खळबळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मार्च 2021

ताज महालात बाँब ठेवल्याच्या अफवेने आज सकाळपासून खळबळ उडाली. एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन ताज महालात बाँब ठेवल्याचे कळवले. त्यानंतर हा संपूर्ण परिसर रिकामा करुन तपासणी सुरु करण्यात आली. ताज महालाला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले. 

आग्रा : ताज महालात बाँब ठेवल्याच्या अफवेने आज सकाळपासून खळबळ उडाली. एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन ताज महालात बाँब ठेवल्याचे कळवले. त्यानंतर हा संपूर्ण परिसर रिकामा करुन तपासणी सुरु करण्यात आली. ताज महालाला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग्रा पोलिसांच्या हेल्पलाईनवर हा फोन आला होता. त्यानंतर लगेचच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला याची माहिती देण्यात आली. ताज महालाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. दलाने लागलीच परिसराची नाकेबंदी करुन पर्यटकांना ताज महालाच्या परिसरातून बाहेर काढले. 

सुरक्षा दलांनी ताजमहालाच्या परिसराची काटेकोरपणे तपासणी केली. कुठीही बाँब ठेवल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ११ वाजल्यानंतर मर्यादित पर्यटकांना परिसरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली. सुरक्षा दलांना फोन करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाली असून त्याला घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
Edited By- Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख