अभिनेत्रीचा आधी अलविदा अन् नंतर म्हणते, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नव्हताच!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने अलविदा मुंबई अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने मोठी चर्चा सुरु झाली होती.
bollywood actress sanjana sanghi clarifies about her instagram post
bollywood actress sanjana sanghi clarifies about her instagram post

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या शेवटच्या चित्रपटातील सहकलाकार संजना संघी हिची पोलिसांनी चौकशी करुन, तिचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर संजना हिने इन्स्टाग्रामवर मुंबईला निरोप देणारी पोस्ट टाकली होती. यामुळे संजना ही बॉलिवूड सोडून निघून गेल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर संजनानेच मी कायमची निघून गेलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. 

संजनाने बुधवारी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते की, खुदा हाफीज, मुंबई. तुमचे चार महिन्यांनंतर दर्शन झाले. मी दिल्लीला परत चालले आहे. तुमचे रस्ते काहीसे वेगळे वाटले, सुनसान होते. माझ्या हृदयात असलेल्या दु:खामुळे माझ्या याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. कदाचित मी आणि  तुम्ही थोड्या दु:खात असावे. पुन्हा भेटूया? लवकरच अथवा कधीही नाही. 

संजना हिच्या या भावनिक पोस्टनंतर तिने बॉलिवूड सोडल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर आता तिने आणखी एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकून खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या आधीच्या पोस्टमधून वेगळा-वेगळा अर्थ काढण्यात आला. मी मुंबईचा कायमचा निरोप घेतलेला नाही. मी चार महिन्यांपासून दिल्लीतील घरी आहे. लवकरच भेटू अथवा नाही, असे म्हणण्याचा माझा उद्देश कोरोनाची स्थिती कधी निवळते यावर भेटणे अलवंबून असेल, असा होता. तुम्ही सर्वांना दाखविलेल्या काळजीबद्दल आभारी आहे. काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.  

सुशांतच्या आत्महत्येमागील सर्व कारणे पडताळली जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 28 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी काही नवीन माहिती समोर आल्याने सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच मिळाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. 

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालालात त्याचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्‍टरांनी स्वाक्षरी केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत. दरम्यान, सुशांतने कुठले विषारी द्रव्य किंवा पदार्थ खाल्ला होता का याचीही तपासणी करण्यात आली होती. प्रयोगशाळेकडून त्याबाबतचा अहवाल मिळाला असून, त्याने कोणताही विषारी पदार्थ मृत्यूआधी खाल्लेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहितीही  सूत्रांनी दिली आहे. सुशांत याच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उलगडले नसून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, अंदाज वर्तविले जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरविणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com