भाजपमधील त्रिकुटाने माझा विश्वासघात केला

त्यांनी आरएसएसच्या एका नेत्याच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते.
The BJP trio betrayed me : Ramesh Jarkiholi
The BJP trio betrayed me : Ramesh Jarkiholi

बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या त्रिकुटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला. आमदार जारकीहोळी अचानक सोमवार (ता. २८ जून) रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोनला अचानक फोन आल्याने दिल्लीला यावे लागले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आरएसएसच्या एका नेत्याच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते. (The BJP trio betrayed me : Ramesh Jarkiholi)

रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीला पोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एका आरएसएस नेत्याच्या घरी सुमारे ४५ मिनिटे बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. दिल्लीत जारकीहोळी आणखी काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.

या आधी दिल्लीत विमानतळावर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, की भाजपमधील तीन जणांनी माझा विश्वासघात केला आहे. त्या तिघांची नावे मी आताच सांगणार नाही. वेळ आल्यावर ती जाहीर करण्यात येतील. ते माझा द्वेष करीत आहेत. माझी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे षडयंत्र उघड होण्याचा काळ आता जवळ आला आहे, असे बोलून त्यानी स्वपक्षीयांविषयीच असमाधान व्यक्त केले.

आपला द्वेष करणाऱ्यांविरुद्ध भाजप हायकमांडकडे ते तक्रार करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पक्षातून येऊन जारकीहोळी भाजपमध्ये वरचढ होण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचले असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांच्याविरुद्ध हायकमांडकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जारकीहोळी करणार असल्याचे वृत्त आहे.

फडणवीस पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार जारकीहोळींची बाजू 

गेल्या आठवड्यात रमेश जारकीहोळी मुंबईला गेले होते. तेथे भाजपचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आपल्यामुळे राज्यात पक्ष सत्तेवर आला आहे. पण, आपणालाच मंत्रिमंडळातून वगळण्याचे षडयंत्र आखण्यात आले, अशी त्यांनी फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते दिल्लीला गेले असून, स्वतः फडणवीसही तेथे उपस्थित आहेत. फडणवीस भाजप नेत्यांकडे जारकीहोळींची बाजू मांडणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com