राज्यात भाजपने अडीच कोटी गरजूंना मदत केली : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या समाजसेवेचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला.कोरोना संकटाच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना केलेल्याजनसेवेचे कौतुक मोदी यांनी केले आहे.
bjp state president chandrakant patil presents report of state unit to narendra modi
bjp state president chandrakant patil presents report of state unit to narendra modi

नवी दिल्ली  : कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी किमान अडीच कोटी गरजूंना मदत केली. शेतकरी व ग्राहक यांच्यात समन्वय साधून भाजपने 5 लाख शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविला. याचबरोबर राज्यात भाजपने 42 लाख 50 हजार लोकांपर्यंत रेशन पोहोचविले, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र भाजपने कोरोनाकाळात केलेल्या समाजकार्याची माहिती पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. मोदींनी यावर मराठीतून पक्ष कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

भाजपच्या "सेवा ही संघटन' या कोरोनाकाळातील गरजूंना मदत देण्याच्या उपक्रमांतर्गत पक्ष कार्यकर्त्यांशी मोदींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पक्षाचे आजी -माजी मुख्यमंत्री व पदाधिकारी देशभरातून यात सहभागी झाले होते. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार व कर्नाटक, उत्तर प्रदेश. आसाम आदी प्रदेशाध्यक्षांनी यावेळी कामाचा अहवाल मोदींना दिला. 

या वेळी पाटील यांनी सांगितले की, कोरोनकाळात राज्य भाजप कार्यकर्त्यांनी किमान अडीच कोटी गरजूंना मदत केली. ऑडिओ-व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून बूथ कार्यकर्त्यांपर्यंत संवाद झाला. भाजपने 18 प्रतिष्ठितांबरोबरही संवाद साधला. "द फिफ्फथ पिलर' या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राज्य भाजपचे काम समाजापर्यंत पोहोचविले. महाराष्ट्र भाजपने 42 लाख 50 हजार लोकांपर्यंत रेशन पोहोचविले. शेतकरी व ग्राहक यांच्यात समन्वय साधून भाजपने 5 लाख शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविला. तसेच, 36 हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि 70 हजार पीपीई किट्सचे वाटप केले. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अॅम्ब्युलन्सची मदत केली. संघाच्या माध्यमातून रक्तनमुन्यांच्या तपासणीला वेग दिला. 2 लाख 64 हजार 400 लोकांच्या चाचण्या केल्या. 

राज्यात 35 हजार कोरोना योध्यांना आभारपत्रे देण्यात आली. श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून जाणाऱ्यांना 16 लाखांहून जास्त श्रमिकांना अन्नाची पाकिटे वाटली. कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना भाजप कार्यकर्त्यांनी ताताडीने मदत केली. मेरा आंगन मेरा रणांगण 11 लाखांहून जास्त भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. कोरोनाकाळात 30 भाजप कार्यकर्त्यांचे निधन झाले. त्यातही मुंबईतील श्रीराम दुबे यांच्या कुटुंबीयांना स्वतः शहा यांनी दूरध्वनी करून सांत्वन केले, याचा समात वेगळा ठसा उमटविला, असे पाटील यांनी नमूद केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com