पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप तारे तारकांना उतरवणार

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सारा जोर लावून तृणमूल कॉंग्रेसडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या नावांच्या निश्‍चिती प्रक्रियेला वेग दिला असून मुख्यतः युवक व नवे चेहरे आणि तारे तारकांना बंगाली जनतेसमोर आणण्याची रणनीती पक्षाने आखल्याची माहिती आहे
Amit Shah- Mamata Banerjee - J P Nadda
Amit Shah- Mamata Banerjee - J P Nadda

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सारा जोर लावून तृणमूल कॉंग्रेसडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या नावांच्या निश्‍चिती प्रक्रियेला वेग दिला असून मुख्यतः युवक व नवे चेहरे आणि तारे तारकांना बंगाली जनतेसमोर आणण्याची रणनीती पक्षाने आखल्याची माहिती आहे. यासंदर्भात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी काल झालेल्या निवडक नेत्यांच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष उपस्थिती लावली.

भाजपने यंदा केरळपेक्षाही पश्‍चिम बंगालवर जास्त जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका लवकरच सुरू होईल. भाजपच्या परिवर्तन यात्रांच्या समारोपानिमित्त होणाऱ्या मोदींच्या पहिल्या सभेला 10 लाखांची गर्दी जमविण्याचे पक्षाचे उद्दिष्ठ आहे. गेली किमान ५ वर्षे भाजप या राज्यात सारे "उपाय' वापरून निवडणुकांसाठीची जमीन तयार करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मतटक्का ४०.६ टक्‍क्‍यांवर गेला व जागाही १८ पर्यंत वाढल्या. त्यातून पक्षाचा उत्साह वाढला असून २०० पेक्षा जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यातही २७ मार्च व १ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी भाजपने उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित होतील. तृणमूलची यादी उद्या जाहीर होणार असल्याने बाजपने घाईघाई सुरू केल्याचे दिसत आहे. जास्तीत जास्त युवा चेहरे व माजी मंत्री राजीव बॅनर्जी व शुभेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलमधून आलेल्या आमदारांना तिकीट देण्याची भाजपची रणनीती आहे. 

दुसऱ्या टप्प्यात भाजपला कडवी लढत देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम जागेवर १ एप्रिलला मतदान आहे. तेथे भाजप कोणाला ममता दीदींसमोर उभे करणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. ममता दीदींचे एकेकाळचे उजवे हात असलेले मुकूल रॉय व शुभेंदूअधिकारी यांच्यासह तृणमूलमधून आलेल्या अनेक आमदारांनी या जागेवर लडण्याची तीव्र इच्छा शहा यांच्याकडे व्यक्त केली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ते सध्या गोपीबल्लुपूरचे खासदार आहेत.

बॅनर्जी यांच्याविरूध्द भाजपने आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. तृणमूलचे आमदार हमीदुल रहेमान यांनी 'निवडणुकीनंतर पाहून घेऊ' अशी जाहीर धमकी दिली त्याबद्दल त्यांना निवडणूक लढवायला बंदी घालावी अशीही भाजपची मागणी आहे. आयोगाला निवेदन दिल्यावर पक्षाचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले, "ममता दीदी म्हणतात 'खेळ होईल' (खेला होबे). खेळ म्हमजे काय? तर मतदान केंद्रे बळकावणे, मतदारांना धक्‍या देणे व निष्पक्ष निवडणुकांत अडथळे आणण्यासाठी प्रचंड हिंसाचार करणे. आम्ही तृणमूलच्या याच खेळाबद्दल आयोगाला माहिती दिली आहे. राज्यात तृणमूलने १२५ नगरपालिकांवर प्रसासक नियुक्त करून अवैध कब्जा केला आहे. या नियुक्‍त्या तातडीने रद्द व्हायला हव्यात,''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com